एक्स्प्लोर

विधानसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न, 96 जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती

सूत्रांच्या माहितीनुसार, परवा रात्री प्रकाश आंबेडकरांच्या मुंबईच्या निवासस्थानी एक बैठक झाली. कॉंग्रेसकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

मुंबई : विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असताना एकीकडे राजकीय यात्रा सुरू झाल्या तर दुसरीकडे निवडणुकीसाठी पडद्या मागच्या हालचाली ही सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्याही बैठका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'काँग्रेसची ऑफर आणि वंचितचा नकार' हाच कित्ता विधानसभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा गिरवला जात असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, परवा रात्री प्रकाश आंबेडकरांच्या मुंबईच्या निवासस्थानी एक बैठक झाली. कॉंग्रेसकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या काँग्रेस नेत्यांनी वंचितला येत्या विधानसभेत 96 जागा देऊ केल्याचे समजते. मात्र वंचितला हे मान्य नसल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांपैकी वंचितला 96 जागा देऊन काँग्रेस 96 आणि राष्ट्रवादी 96 जागांवर निवडणूक लढवेल, असा फॉर्म्युला या नेत्यांनी आंबेडकरांसमोर ठेवल्याचे समजते. परंतू वंचितला ज्या 96 जागा देऊ केल्या आहेत त्या तिसरी आघाडी म्हणून दिल्या जातील, अशी काँग्रेसची भूमिका असून त्यात वंचितला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इतर मित्र पक्षाच्या उमेदवारांनाही सामावून घ्यावे लागणार आहे. मात्र हे प्रकाश आंबेडकरांना मान्य नसल्याचे समजते. 'काँग्रेस नेत्यांची ही ऑफर अमान्य करत आंबेडकरांनी वंचितसाठी पूर्ण 96 जागा मागितल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या मित्र पक्षांना आपापल्या 96 जागांमध्ये सामावून घ्यावे', अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितला फार यश मिळालं नसलं तरी आघाडी न झाल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडून भाजपला यश मिळवून देण्यात नक्कीच काही ठिकाणी वंचितची मदत झाली. त्यामुळे चिडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वंचितला भाजपाची बी टीम म्हणत नावे ठेवली असली तरी परत एकदा अवघ्या दोन महिन्यांत हे ही विसरून पुन्हा विधानसभेसाठी वाटाघाटीला सुरुवात करण्यात आली आहे. विधानसभेचे वारे वाहू लागल्यापासून बरीच मंडळी काँग्रेस राष्ट्रवादी सोडून भाजप-सेनेत जाऊ बघते आहे. बरीच नेते मंडळी ही आपल्याला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळू शकते का? हे ही प्रामुख्याने तपासत आहेत. मात्र यावेळीही प्रकाश आंबेडकर वाटाघाटींसाठी न थांबता आपली उमेदवार यादी घोषित करणार असल्याचे समजते आहे. आता हे दबाव तंत्र आहे की सत्यता? हे येत्या काळात समजेलच.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget