एक्स्प्लोर
Advertisement
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर?
खरं तर, विखे पाटील यांचा प्रवेश लवकर व्हावा, म्हणून भाजपकडून दबाव आहे. पण काँग्रेसमधील नाराज आमदार 23 मेपर्यंत थांबवण्याची भूमिका घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये होणाऱ्या सभेत विखे प्रवेश करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते भाजपच्या गोटात सामील होण्याची चिन्हं आहेत.
काँग्रेसमधील काही नाराज आमदारांना घेऊन विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खरं तर, विखे पाटील यांचा प्रवेश लवकर व्हावा, म्हणून भाजपकडून दबाव आहे. पण काँग्रेसमधील नाराज आमदार 23 मेपर्यंत थांबवण्याची भूमिका घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निर्णय घेण्याचं सूतोवाच करत राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते. त्यामुळे सुपुत्र सुजय विखेंपाठोपाठ वडीलही भाजपचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता आहे.
VIDEO | 15 दिवसात राधाकृष्ण विखे पाटील राजकीय भूकंप करणार? | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
तोंडी परीक्षेत काय म्हणाले होते?
येत्या 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे. मी गोंधळलेलो नाही, उलट माझ्यामुळे अनेक जण गोंधळले आहेत. सुजयच्या तिकिटावरुन निर्माण झालेला गोंधळ थांबवण्याचा मी प्रयत्न केला, मात्र गोंधळ थांबवू शकलो नाही.सुजयचा भाजपात जाण्याचा निर्णय योग्यच होता, त्याला भाजपने सन्मानाने बोलावलं. मुलगा पुढं जातोय याचं समाधान आहे, अशा भावनाही विखे पाटलांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केल्या होत्या. सुजय विखेंचा भाजपप्रवेशाचा निर्णय योग्यच, वडील राधाकृष्ण विखे पाटलांचं मत सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता. आता ते अहमदनगरमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. VIDEO | सुजय विखेंचा नेत्याच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करतानाचा फोटो वायरल | अहमदनगर | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
ठाणे
Advertisement