एक्स्प्लोर

Lok Sabha Election : एका वर्षात मध्यावधी लागू शकते तयार राहा, फडणवीस ते योगींचा दाखला देत काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्यानं खळबळ, Video

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस, योगींचा दाखला देत मध्यावधी निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

रायपूर : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नेते म्हणून एनडीएच्या (NDA) घटकपक्षाच्या नेत्यांनी निवड केली. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. एनडीएच्या घटकपक्षांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे एनडीएत मोठ्या घडामोडी सुरु असताना काँग्रेस (Congress) नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करा, अशी भाजप पक्षनेतृत्त्वाला विनंती केली होती. या वक्तव्याचा संदर्भ देत भूपेश बघेल यांनी कार्यकर्त्यांनो तयार राहा 6 महिन्यात ते वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असं म्हटलं आहे. 

फडणवीस राजीनामा देत होते, योगींची खूर्ची डळमळीत झालीय, राजस्थानच्या भजनलाल शर्मांची खूर्ची डगमगतेय. सर्व मुख्यमंत्र्यांच्या खूर्च्या डगमगू लागल्या आहेत. सरकार बनलं नाही नितीश कुमारांचे प्रवक्ते अग्निवीर योजना बंद करा म्हणतात. जातनिहाय जनगणनेची मागणी करतात, राहुल गांधी यांनी पण जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे असं म्हटल्याचं भूपेश बघेल यांनी सांगितलं. 

जदयूच्या प्रवक्त्यांनी यूसीसीची गरज नाही, असं म्हटलं आहे. आता यांचं सरकार येणार आहे. यांचं घर बसलं नाही तोच भांडण सुरु झालं आहे, असं भूपेश बघेल म्हणाले. कार्यकर्त्यांनो तयार राहा, सहा महिने ते एका वर्षात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असं भूपेश बघेल यांनी म्हटलं.

भूपेश बघेल यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, एका दिवसात तीन तीन वेळा कपडे बदलणारे एकाच ड्रेसवर कार्यक्रम करत  आहेत. पार्टी तोडणारे, निर्वाचित मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणारे, घाबरवणाऱ्यांना धमक्या देणाऱ्यांना जनतेनं चांगला धडा शिकवल्याचं भूपेश बघेल म्हणाले.  

दरम्यान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदारांची संख्या 2019 च्या तुलनेत 23 वरुन 2024 ला 9 वर पोहोचली. भाजपच्या उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या जबाबदारीतून मोकळं करण्याची विनंती पक्षनेतृत्त्वाला करत असल्याचं म्हटलं होतं. अमित शाह यांनी मात्र केंद्रातील शपथविधी सोहळा होईपर्यंत कार्यरत राहण्याच्या आणि नंतर निर्णय घेऊ अशा फडणवीस यांना सूचना दिल्या आहेत.   

काँग्रेसचं देशातील कामगिरी सुधारली असून महाराष्ट्रात काँग्रेसला 13 जागा मिळाल्या. दुसरीकडे छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून पराभव स्वीकारावा लागला.  

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक

मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget