एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गेल्या वेळी केवळ एका मताने पराभव, यावेळी...
2008 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका मताने भाजपच्या कल्याण सिंह यांनी सीपी जोशींना पराभूत केलं होतं. कल्याण सिंह यांना त्यावेळी 62 हजार 216 मतं पडली होती, तर जोशींनी तेव्हा 62 हजार 215 मतं मिळवली होती.
मुंबई : निसटता पराभव काय असतो, हे सीपी जोशी यांच्याशिवाय कोणीच नीट सांगू शकणार नाही. राजस्थानातील 2008 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका मताने पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीपी जोशी यांना यंदा मोठा दिलासा मिळाला. सीपी जोशी यावेळी आमदारपदी निवडून आले आहेत.
राजस्थानातील नाथद्वारा मतदारसंघातून सीपी जोशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सीपी जोशी यांनी राजस्थानातील भिलवाडा मतदारसंघातून खासदारकी भूषवली होती. तर यापूर्वी चार वेळा ते आमदार राहिले आहेत.
2008 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका मताने भाजपच्या कल्याण सिंह यांनी सीपी जोशींना पराभूत केलं होतं. कल्याण सिंह यांना त्यावेळी 62 हजार 216 मतं पडली होती, तर जोशींनी तेव्हा 62 हजार 215 मतं मिळवली होती.
यावेळी सीपी जोशींच्या समोर आठ उमेदवारांचं आव्हान होतं. 11 वर्षांनी भाजपमध्ये परतलेल्या महेश प्रताप सिंह यांचं जोशींसमोर तगडं आव्हान होतं, मात्र 10 हजार 439 च्या मताधिक्याने जोशी विजयी झाले.
या मतदारसंघात 75.05 टक्के मतदान झालं होतं. या मतदारसंघात 2 लाख 26 हजार 866 मतदार आहेत.
वसुंधरा राजेंनी राजस्थान गमावलं
गेल्या वीस वर्षांत कुठल्याच पक्षाला राजस्थानमध्ये सलग दोन टर्म सत्ता काय राखता आलेली नाही. काँग्रेस आणि भाजप यांची राजस्थानात आलटून पालटून सत्ता येत असते. ही परंपरा मोडून काढण्याची संधी वसुंधरा राजे यांनी गमावली. राजस्थानने वसुंधरा राजे यांना सपशेल नाकारलं.
राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा असून 199 जागांसाठी मतदान झाले. राजस्थानात बहुमताचा आकडा 101 आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पक्षासह विविध लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष उमेदवार मिळून तब्बल 2274 उमेदवार रिंगणात उभे होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement