(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashwani Kumar : हा सामूहिक चिंतेचा विषय; अश्विनी कुमार यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले काँग्रेसच्या जी-23 समुहातील नेते
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदे मंत्री अश्विनी कुमार (Ashwani Kumar) यांनी पक्षांचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Ashwani Kumar Resigns From Congress : सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. गोवा आणि उत्तराखंडमधील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 2 टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान, येत्या 20 फेब्रुवारीला पंजाब विधानसभेसाठी (Punjab Election 2022) मतदान होत आहे. त्यापूर्वीच पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदे मंत्री अश्विनी कुमार (Ashwani Kumar) यांनी पक्षांचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अश्विनी कुमार यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि काँग्रेसच्या ग्रुप -23 ग्रुप मधील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्विनी कुमार यांनी राजीनामा दिल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर कँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दु:ख आणि नाराजी व्यक्त केली आहे. हा सामुहीक चिंतेचा विषय असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमचे महत्त्वाचे सहकारी अश्विनी कुमार यांनी काँग्रेस सोडल्याचे पाहून दुःख झाले. चार दशके पक्षाची सेवा करणारा माणूस निघून गेला हे दुर्दैव आहे. ही सामूहिक चिंतेची बाब असल्याचे अश्विनी कुमार यांनी म्हटले आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांगी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनी कुमार यांनी काँग्रेस सोडल्याची बातमी दुःखद आणि दुर्दैवी आहे. तो माझा जुना मित्र आहे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी मंत्री आणि खासदार मनीष तिवारी (Manish Tewari) यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. अश्विनी कुमार यांच्या राजीनाम्याचे दुःख आहे. आमच्यामध्ये मतभेद होते, पण ते अतिशय सभ्य पद्धतीने होते. अश्विनी कुमार यांना हा निर्णय घेणे भाग पाडले हे दुर्दैवी असल्याचे तिवारी म्हणाले. आनंद शर्मा, मनीष तिवरी आणि हुड्ड हे जी-23 समुहातील नेते आहेत. ज्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकांची मागणी केली होती. जी-23 हा काँग्रेसमदीव नाराज नेत्यांचा गट आहे.
अश्विनी कुमार 2002 मध्ये पहिल्यांदा पंजाबमधून राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 2004 आणि 2010 मध्येही अश्विनी कुमार पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अश्विनीकुमार यांच्याकडे कायदा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अश्विनी कुमार यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: