एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पिछाडीवर
लोकसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपप्रणित एनडीएला 337 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 90 जागांवर आघाडी मिळाली आहे. 115 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपप्रणित एनडीएला 337 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 90 जागांवर आघाडी मिळाली आहे. 115 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील 48 जागांचा विचार केला तर भाजप 24, शिवसेना 20, राष्ट्रवादी 3 आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील प्रचारादरम्यान सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. निवडणूक काळात राज यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली होती. नुसतीच टीका केली नाही तर राज यांनी सत्ताधाऱ्यांवर जे आरोप केले, ते सिद्ध करण्यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून राज यांनी काही पुरावेदेखील सादर केले.
राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा काग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फायदा होईल तसेच भाजप-शिवसेना युतीची मतं कमी होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. परंतु राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड आणि सातारावगळता इतर सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा कांग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले की, राज ठाकरे यांच्या सभांचा आघाडीपेक्षा आम्हालाच जास्त फायदा झाला आहे. तर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, आमच्या सभांमुळे भाजप-शिवसेनेचं मताधिक्य खूप कमी झालं आहे. केवळ वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फोडल्यामुळे भाजप-शिवसेनेचे उमेदवार तरले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement