एक्स्प्लोर

भगवान शंकराच्या प्रतिमेवर पाय, सनी देओलविरोधात काँग्रेस आक्रमक

गुरुदासपूरमध्ये काढलेल्या रोडशो अभिनेता सनी देओलने भगवान शंकराच्या तसवीरीला पाय लावून अवमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली : भगवान शंकर यांच्या प्रतिमेवर अनवधानाने पाय देणं अभिनेता आणि भाजप उमेदवार सनी देओलला महागात पडण्याची चिन्हं आहेत. गुरुदासपूरमध्ये काढलेल्या रोडशो दरम्यान ट्रकवर बसलं असताना नजरचुकीने सनीचा पाय भगवान शंकराच्या तसवीरीवर पडल्याचं दिसत आहे. गुरुदासपूरमध्ये काही दिवसांपूर्वी सनी देओलचा रोड शो झाला. यावेळी सनी देओलसह अनेक भाजप कार्यकर्ते ट्रकच्या टपावर बसले होते. ट्रकच्या समोरच्या बाजूला भगवान शंकर यांचा फोटो होता. यावेळी सनीचे पाय भगवान शंकराच्या तसवीरीला लागल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे माजी आमदार अश्वनी सेखडी यांनी सनी देओलच्या पुतळ्याची जाळपोळ करुन निषेध नोंदवला आहे. त्यानंतर पोलिसांनी येत्या 48 तासात प्रकरणाचा तपास करुन कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. VIDEO | ढाई किलो का हाथ, भाजप के साथ, सनी देओलचा भाजपप्रवेश | स्पेशल रिपोर्ट सनीने त्याचे खरे नाव अजय सिंह देओल या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सनीकडे एकूण 87 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्याने 53 कोटी रुपयांचे कर्जदेखील घेतलेले आहे. सनीकडे 60 कोटी रुपयांची जंगम आणि 21 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती आहे. त्याच्या बँक खात्यात 35 लाख रुपयांची रोकड आहे. सनीची पत्नी पूजा देओल यांच्याकडे 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पूजा यांच्या दोन बँक खात्यांमध्ये 19 लाख आणि 16 लाख रुपयांची रोकड आहे. VIDEO | सनी देओलने भगवान शंकराच्या प्रतिमेला पाय लावल्याचा आरोप गुरुदासपूर हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा पारंपरिक मतदारसंघ होता. 1997,1999, 2004 आणि 2014 मध्ये ते या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. 2017 मध्ये विनोद खन्नांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुनील जाखड हे तब्बल 1,93,219 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेसकडून ही सीट खेचून आणण्याचा भाजपचा मानस असेल. निवडणूक लढवण्यासाठी सनी देओल स्वत: फारसा उत्सुक नव्हता. भाजप नेत्यांनी गळ घातल्यामुळे अखेर सनीने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. सनी देओल यांची सावत्र आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनीही मथुरेतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे विजेतेपदाची माळ दोघांच्याही गळ्यात पडली, तर चित्रपट विश्वातील मायलेक संसदेतही एकत्र झळकण्याची कदाचित ही पहिलीच वेळ ठरेल. 62 वर्षांचा सनी देओल 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून मुलगा करण देओलला लाँच करत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुराही त्याच्याच खांद्यावर आहे. त्याची भूमिका असलेला 'मोहल्ला अस्सी' काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यामुळे त्याचं प्रदर्शनही वारंवार लांबणीवर पडत होतं. भाईजी सुपरहिट, यमला पगला दिवाना, पोस्टर बॉईज, घायल वन्स अगेन हे त्याचे नजीकच्या काळातले चित्रपट. सनीने 1983 साली बेताब चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर वर्दी, त्रिदेव, चालबाज, निगाहे यासारख्या चित्रपटातील त्याच्या अॅक्शन भूमिका अधिक गाजल्या. 1990 साली राजकुमार संतोषींच्या 'घायल' चित्रपटाने त्याला चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर दामिनी, डर, घातक, बॉर्डर, गदर एक प्रेमकथा यासारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget