एक्स्प्लोर

BJP Manifesto : 500 रुपयांत गॅस सिलेंडर, एक लाख सरकारी नोकऱ्या; छत्तीसगडसाठी भाजपचा जाहीरनामा

Chhattisgarh BJP Manifesto : गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भाजपने विवाहित महिलांना 12000 रुपये वार्षिक आर्थिक सहाय्यता देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

Chhattisgarh Election 2023 : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या (Assembly Election 2023) रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Chhattisgarh Assembly Election 2023) छत्तीसगडसाठी भाजपने जाहीरनामा (Chhattisgarh BJP Manifesto) प्रसिद्ध केला आहे. रायपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'छत्तीसगड 2023 साठी मोदींची हमी' नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात जनतेला 20 आश्वासने देण्यात आली आहेत. या जाहीरनाम्यात भाजप (BJP) ने 500 रुपयांत गॅस सिलेंडर, एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच, विवाहित महिलांना वार्षिक आर्थिक सहाय्य देण्याचंही घोषणापत्रात म्हटलं आहे. 

जाहीरनामा प्रसिद्ध करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "हा केवळ भाजपचा जाहीरनामा नाही, तर एक संकल्प पत्र आहे. आमच्या संकल्पाची पूर्तता करून आम्ही 2000 साली छत्तीसगड राज्याची स्थापना केली."

छत्तीसगडसाठी भाजपचा जाहीरनामा

  • कृषक उन्नती योजना - 3100 रुपये प्रति क्विंटल दराने धान्य खरेदी. प्रत्येक पंचायतीच्या कॅश काउंटरवर संपूर्ण एकरकमी मोबदला.
  • महतरी वंदन योजना - विवाहित महिलांना 12,000 रुपये वार्षिक आर्थिक मदत दिली जाईल.
  • भरती - एक लाख रिक्त सरकारी पदांवर भरती.
  • पीएम आवास योजना - मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत 18 लाख लोकांना पीएम आवास योजनेअंतर्गत निधी दिला जाणार आहे.
  • तेंदूपत्ता संकलन - या अंतर्गत प्रति बॅग 550 रुपये आणि 4500 रुपयांपर्यंत बोनस दिला जाईल.
  • दीनदयाल उपाध्याय कृषी योजना - या योजनेअंतर्गत, भूमिहीन शेतमजुरांना दरवर्षी 10,000 रुपये दिले जातील.
  • आयुषमान भारत, स्वस्थ छत्तीसगड - या योजनेअंतर्गत राज्यातील लोकांना 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जाणार आहेत.
  • यूपीएससीच्या धर्तीवर परीक्षा होणार आहेत. CGPSC घोटाळ्याची चौकशी.
  • छत्तीसगड उद्योग क्रांती योजना - या अंतर्गत तरुणांना 50 टक्के अनुदानासह बिनव्याजी कर्ज दिले जाईल.
  • राज्य राजधानी क्षेत्र - रायपूर, नया रायपूर, दुर्ग आणि भिलाई नगरच्या विकासासाठी दिल्ली एनसीआरच्या धर्तीवर राज्य राजधानी क्षेत्र तयार केले जाईल.
  • इनोव्हेशन हब - नया रायपूर हे मध्य भारताचे इनोव्हेशन हब असेल. यामुळे 6 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
  • राणी दुर्गावती योजना - बीपीएल मुलींच्या जन्मावर दीड लाख रुपयांचे हमी प्रमाणपत्र.
  • गरीब कुटुंबातील महिलांना 500 रुपयांत गॅस सिलेंडर देण्यात येईल.
  • मासिक प्रवास भत्ता - विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी DBT मधून मासिक प्रवास भत्ता दिला जाईल.
  • भ्रष्टाचाराबाबत तक्रार निवारण आणि देखरेखीसाठी वेब पोर्टल.
  • एम्सच्या धर्तीवर प्रत्येक विभागात छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स उघडले जाईल आणि आयआयटीच्या धर्तीवर छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रत्येक लोकसभेत उघडली जाईल.
  • छत्तीसगडमधील गुंतवणुकीसंदर्भात दरवर्षी जागतिक दर्जाची परिषद आयोजित केली जाईल.
  • सरकार तुन्हार दुवार - या अंतर्गत पंचायत स्तरावर दीड लाख बेरोजगारांची भरती केली जाईल.
  • शक्तीपीठ प्रकल्प - चार धाम प्रकल्पाच्या धर्तीवर पाच शक्तीपीठांसाठी 1000 किमीचा प्रकल्प.
  • छत्तीसगडमधील लोकांना रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला नेण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका, 7 आणि 17 नोव्हेंबरला मतदान; पुन्हा काँग्रेस सरकार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget