एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोणत्याही राज्यात काँग्रेससोबत युती करणार नाही, मायावतींचा काँग्रेसला दणका
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला एक मोठा फटका बसला आहे. काँग्रेस पक्षासोबत कोणत्याही राज्यात युती करणार नसल्याचे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी आज जाहीर केले आहे.
लखनौ : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला एक मोठा फटका बसला आहे. काँग्रेस पक्षासोबत कोणत्याही राज्यात युती करणार नसल्याचे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी आज जाहीर केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशसह देशात अनेक ठिकाणी काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस सरकारसोबत युती करण्याच्या निर्णयाबाबत मायावती म्हणाल्या की, "आम्ही उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. आमच्या दोन समविचारी पक्षांची ही युती उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी पुरेशी आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने महाआघाडीत यावे यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रयत्न केले होते. परंतु आता मायावतींच्या निर्णयानंतर महाआघाडीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, दिल्लीत काँग्रेसने आम आदमी पक्षाला सोबत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज मायावतींनी काँग्रेससोबत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतांचं विभाजन होवून भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement