एक्स्प्लोर

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 2100 ते शेतकरी कर्जमाफी, भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस, जाणून घ्या 5 वर्षांत काय करणार?

भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा सादर केला आहे. या जाहीरमान्यात भाजपाने मतदारांना मोठी आश्वासनं दिली आहेत.

मुंबई : मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' (BJP election manifesto 2024) असे दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?

>>>> लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल. 

>>>> शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. १२,००० वरून रु. १५,०००, तसेच एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल. 

>>>> प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.

>>>> वृद्ध पेंशन धारकांना महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल.

>>>> महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार-चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील.

>>>> येणाऱ्या काळात २५ लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु. १०,००० विद्यावेतन देण्यात येईल.

>>>> राज्यातील ग्रामीण भागात ४५,००० गावांत पांधण रस्ते बांधण्यात येतील.

>>>> अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु१५,००० वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल.

>>>> वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल.

>>>> सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत' व्हिजन महाराष्ट्र @ २०२९० सादर करण्यात येईल.

>>>> सन २०२८ पर्यंत महाराष्ट्राला $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविण्याचं लक्ष्य ठेवले आहे.

>>>> महाराष्ट्राला तंत्रज्ञान, उत्पादन आणि नावीन्यपूर्ण (Innovation) संकल्पना क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्यासाठी खालील पावलं उचलण्यात येतील
 'मेक इन महाराष्ट्र' धोरण राबवून, महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करण्यात येईल. 

>>>> महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) राजधानी बनविण्यात येईल. त्यासाठी जागतिक फिनटेक कंपन्यांना आकर्षित करणारं वातावरण निर्माण करण्यात येईल आणि आर्थिक तंत्रज्ञानातील नवीन संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येईल. सोबतच AI संशोधन, नवकल्पना आणि विकासाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल.

>>>> नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादन हब म्हणून विकसित करण्यात येईल.

>>>> शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांगीण उपक्रमांद्वारे प्रयत्न करण्यात येतील

>>>> शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील संपूर्ण राज्य वस्तु व सेवा कर (SGST) अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना परत देऊ. 

>>>> शेतक-यांना प्रति क्विंटल किमान रु. ६०००/- भाव मिळावा यासाठी सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण श्रृंखलेची स्थापना करू.

>>>> सन २०२७ पर्यंत महाराष्ट्रात ५० लक्ष लखपती दीदी तयार करण्यात येतील. यासाठी, प्रत्येक ५०० स्वयंसहायता गटांचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि २१,००० कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येईल. 

>>>> 'अक्षय अन्न योजना' अंतर्गत, कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा पुरविण्यात येतील. ज्यामध्ये तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असेल. 

>>>> 'महारथी (महाराष्ट्र एडवांस रोबोटिक्स अँड AI ट्रेनिंग हब इनिशिएटिव्ह) अटल टिंकरिंग लॅब्स योजना' सुरू करण्यात येईल, ज्यामधून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI शिकण्याच्या संधी उपलब्ध होतील. 

>>>> महाराष्ट्रात कौशल्य जनगणना (Skill Census) करण्यात येईल ज्यायोगे उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्यांच्या तुटवड्यांचे विश्लेषण करून त्यावर आधारित उपलब्ध कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे आणि आवश्यकतेप्रमाणे नवीन कुशल मनुष्यबळ उपलब्धीसाठी नियोजन करता येईल.

>>>> महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 'छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र' स्थापन करण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून १० लाख नवीन उद्योजक तयार केले जातील. या केंद्रांमध्ये को वकिंग स्पेस आणि इनक्युबेशन सुविधांचा समावेश असेल, जेथे विद्यार्थी, व्यावसायिक, आणि उद्योजक एकत्र येऊन, नेटवर्किंग करून, नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यात येईल. 

>>>> अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी ₹१५ लाख पर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येईल. 

>>>> ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, व्हीजेएनटीमधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल.

>>>> १८ ते ३५ वयोगटातील तरुणांच्या वार्षिक आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद युवा आरोग्य कार्ड (Youth Health Card) सुरू करण्यात येईल तसेच नशामुक्त-व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कायमस्वरूपी योजना लागू करण्यात येईल.

>>>> महाराष्ट्रात प्राचीन आणि ऐतिहासिक गड किल्ल्यांची मोठी संख्या आहे. है गड़ किल्ले महाराष्ट्राचे वैभव असून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारश्याचे जतन व संवर्धन यासाठी गड-किल्ले विकास प्राधिकरण स्थापित करणार, 

>>>> 'ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य धोरण स्वीकारण्यात येईल

>>>> प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी स्वयंचलित सेवा मिळवण्यासाठी आधार सक्षम सेवा वितरण (AESD) लागू करणे.

>>>> वय वर्षे ८० व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केलेली कागदपत्रे- जसे की आरोग्य नोंदी, ओळखपत्रे आणि पेन्शन संबंधित कागदपत्रे वेट त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल. 

>>>> सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बाहारुग्ण कक्ष (OPD) सुरू करण्यात येतील. 

>>>> बळजबरी व फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करण्यात येईल. बळजबरी आणि फसवणूक करणान्या धर्मांतरापासून संरक्षण मिळेल. 

>>>> वनालगत, शेतीमध्ये, मानवी वस्त्यांमध्ये वाघ, बिबट्या, हत्ती, रोही, रानडुक्कर आणि माकड या वन्यप्राण्यांमुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी तसेच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञान, ड्रोन आणि रेडिओ कॉलर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येईल.

सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, भाजपाच्या या जाहीरनाम्यावेळी भाजपाचे नेते अमित शाह तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वाखालील 18 विभागप्रमुखांच्या समितीने भाजपचे हे संकल्पपत्र (BJP election manifesto 2024) तयार केले आहे. जो संकल्प करतोय, तो महाराष्ट्रच्या प्रगतीचा विकासाचा आणि छत्रपतींच्या रयतेचा आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली राज्याची वेगाने वाढ होत आहे. राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढत आहे. महाविकास आघाडीच्या काळात दरडोई उत्पन्न सहा हजार रुपयांनी कमी झाले होते, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा :

मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता! फलटणच्या मातीत अजितदादांचं रामराजेंना ओपन चॅलेंज

अरे बाप नाही, तुझा काकाच आश्वासनं पूर्ण करणार, जयंत पाटलांनी अजितदादांवर केलेल्या विधानाची चर्चा!

साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
Sanjay Raut : संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
'मी पठाण आहे, गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला या आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
'मला गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Asaduddin Owaisi Speech | मुस्लीम उमेदवारावरून भाजपवर टीका, ओवैसींची संभाजीनगरमध्ये सभाABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
Sanjay Raut : संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
'मी पठाण आहे, गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला या आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
'मला गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
Sanjay Raut : 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
Raj Thackeray on Ajit Pawar : सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
Praniti Shinde: 'लाव रे तो व्हिडिओ...',  खासदार धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्यावर प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या, 'काय बिघडवता आमचं ते...'
'लाव रे तो व्हिडिओ...', खासदार धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्यावर प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या, 'काय बिघडवता आमचं ते...'
Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
Embed widget