एक्स्प्लोर

साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!

अजित पवार यांनी साताऱ्यातील सभेत बोलताना लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. त्यांनी पिपाणीमुळे उदयनराजे यांचा विजय झाला, असं म्हटलं.

सातारा : विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. राज्यातील प्रमुख नेतेमंडळी राज्यभरात संपूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. राज्यातील प्रत्येक भागात सभा घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे तर संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेऊन ते अल्पसंख्याक, दलित समाजाला आश्वासित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, साताऱ्यातील एका सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत कशा प्रकारे अनेक जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले, यावर भाष्य केलं आहे. अनेक महत्त्वाच्या जागांवर कशा पद्धतीने मतं कमी पडली आणि कोणत्या जागांवर आपण सुदैवाने विजयी झालो, यावरही अजित पवार बोलले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सातारा लोकसभा निवडणुकीवर बोलताना, पिपाणीमुळे सातारा जागा वाचली. आमचा राजा वाचला. आमचे 13 वे वंशज वाचले असे भाष्य केले. 

लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह राबवण्यात आले

अजित पवार यांनी साताऱ्यातील आपल्या भाषणाच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. "पराभव झाल्यानंतर खचून जायचं नसतं. यश मिळाल्यानंतर हुरळून जायचं नसतं. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा कामाला लागले. आम्हीदेखील विचार केला. आपण एवढे काम करून लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी का पडलो, याचाही आम्ही विचार केला. त्यावेळी पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं. उन्हाळ्याची निवडणूक होती. आता सगळीकडे चांगला पाऊस झाला आहे. सगळी धरणं भरली आहेत. विहिरींना चांगलं पाणी आहे. लोकसभा निवडणुकीत मागासवर्गीय लोकांच्या डोक्यात बिंबवण्यात आलं. संविधान बदलणार असं लोकांना सांगण्यात आलं. केंद्रात सरकार आणण्यासाठी जागा लागतात पावणे तीनशे आणि हे चारशे पार असा नारा देत आहेत. यांना संविधान बदलायचं आहे. आरक्षण बदलायचं आहे. घटना बदलायची आहे, असा खोटा प्रचार करण्यात आला. हा प्रचार मागासवर्गीयांना खरा वाटला," असं अजित पवार म्हणाले.

सकाळी सात वाजल्यापासून आमच्याविरोधात मत करण्यासाठी रांगा लागल्या

 तसेच, माझ्या मुस्लीम समाजाला सांगण्यात आलं की, एनडीएचं सरकार परत आलं की तुम्हाला सगळ्यांना गोळा करणार पाकिस्तान, बांगलादेशल पाठवून देणार, असं सांगण्यात आलं. मुस्लीम समाजालाही हे खरं वाटलं. त्यामुळे मतदानाच्या दिवशी आमच्याविरोधात सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्या. मी पहिल्यापासून अल्पसंख्याक समाजाला मदत देण्याचं, आधार करण्याचं काम केलं. पण त्यांनीही आम्हाला थोडं बाजूला केलं. संविधान बदललं तर आमचंही आरक्षण जाणार असं आदिवासी समाजाला वाटलं, अशी उजळणीही त्यांनी केली.

13 वे वंशज वाचले, थोडीफार इज्जत वाचली

पुढं बोलताना त्यांनी फेक नरेटिव्हचा महायुतीला फटका बसला, असा दावा केला. त्यांनी अनेक मतदारसंघांचा दाखला दिला. साताऱ्याच्या जागेवरही ते बोलले. "कुठनं कुठनं काय कल्पना काढल्या माहिती नाही. झालं आमची वाटच लावली. बारामतीत, माढ्यात आमची वाट लावली. सातारला पिपाणीने वाचवलं. लोकांना तुतारीसारखी पिपाणी दिसली. 35 ते 40 हजार मतं पिपाणीला गेली. झालं आमचा राजा वाचला बाबा. आमचे 13 वे वंशज वाचले. त्यामुळे आमची थोडीफार इज्जत वाचली, असा लोकसभा निवडणुकीत निकाल लागला," असे अजित पवार हसत हसत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा साधारण 32771 मतांनी विजय झाला. याच जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे उभे होते. ते या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर होते. तर तिसऱ्या स्थानावर संजय गाडे नावाची व्यक्ती अपक्ष म्हणून उभी होती. गाडे यांना या निवडणुकीत 37062  हजार मतं पाडली होती. गाडे यांचे निवडणूक चिन्ह ट्रम्पेट (पिपाणी) हे होते. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना मिळणारी अनेक मते गाडे यांना मिळाली आणि मतविभाजनामुळे त्यांचा पराभव झाला, असा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता.  

Ajit Pawar Video News :

हेही वाचा :

Akhil Chitre : मनसे जिंकण्यासाठी नाही, तर दुसऱ्यांचे उमेदवार पाडण्यासाठी लढत आहे; राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अखिल चित्रे काय म्हणाले?

सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासनUlema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
Satej Patil: महिलांची व्यवस्था करतो, याचा अर्थ काय? धनंजय महाडिकांच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
धनंजय महाडिकांची लाडक्या बहि‍णींना धमकी, महिला मतदानातून याचं उत्तर देतील; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Embed widget