एक्स्प्लोर

Walmik Karad: मोठी बातमी: वाल्मीक कराड पोलिसांसमोर कधी सरेंडर होणार? महत्त्वाची अपडेट, बीडमध्ये घडामोडींना वेग

Beed crime: वाल्मीक कराडला सूचना मिळाल्या? पुढील काही तासांत पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याची माहिती. बीड जिल्ह्यातील घडामोडींना प्रचंड वेग

बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणात रडारवर असलेला वाल्मीक कराड लवकरच पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून वाल्मीक कराड फरार आहे. मात्र, तो सोमवारी संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत बीड पोलिसांसमोर आत्मसमपर्ण करेल, असे सांगितले जात आहे. वाल्मीक कराड हा महाराष्ट्रातच आहे की राज्याबाहेर आहे, याबाबत नेमकी माहिती नाही. तो राज्याबाहेर असल्यास मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास कार्यकर्ता असल्यामुळे पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाहीत, असा आरोप केला जात आहे. सध्या तरी पोलिसांनी वाल्मीक कराड याच्यावर पवनचक्की मालकाकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरुनच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामुळे याप्रकरणातही कराड याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. सीआयडीचे बडे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून तपास करत आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सीआयडीच्या 9 पथकांमधील 150 पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली असून त्यांचे पासपोर्टही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपींचा देशाबाहेर पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. आता पोलीस संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि वाल्मीक कराड यांना कधी अटक करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, वाल्मीक कराड यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वाल्मीक कराड स्वत: बीड पोलिसांच्या स्वाधीन होतील, असे सांगितले जात आहे. वाल्मीक कराड यांनी सोमवारी रात्री स्वत:ला पुणे पोलिसांच्या हवाली केले, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या बातमीची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. परंतु, वाल्मीक कराड हे आज संध्याकाळी किंवा उदया सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

स्कॉर्पिओतील ठसे जुळले

सरपंच संतोष देशमुख यांचे ज्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करण्यात आले होते. त्या गाडीची सीआयडीकडून तपासणी करण्यात आली. या गाडीतील ठसे आणि आरोपींच्या हातांचे ठसे जुळले आहेत. याशिवाय, आरोपींचे मोबाइलही पोलिसांना सापडले आहेत. हे मोबाईल फॉरेन्सिक खात्याकडे पाठवण्यात आले आहेत. पोलीस आणि सीआयडीकडून याप्रकरणी आतापर्यंत 100 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांची रविवारी तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी माझ्याकडील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राजकीय गोष्टीत फोटो आणि फोन होत असतात. या गोष्टी सीआयडीला मिळाल्यामुळे त्यांनी मला चौकशीसाठी बोलावले होते, असे  संध्या सोनावणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

आणखी वाचा

सुरेश धस यांची तक्रार करण्यासाठी प्राजक्ता माळी थेट सागर बंगल्यावर, देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranya Rao Arrest : थेट पोलिस महासंचालकाची लेक दुबईतून आणलेल्या 15 किलोच्या सोन्याच्या तस्करीत विमानतळावर सापडली; म्हणाले, 'माझ्या करिअरला आजवर डाग लागलेला नाही, पण...'
थेट पोलिस महासंचालकाची लेक दुबईतून आणलेल्या 15 किलोच्या सोन्याच्या तस्करीत विमानतळावर सापडली; म्हणाले, 'माझ्या करिअरला आजवर डाग लागलेला नाही, पण...'
Bird Flu : धाराशिवमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग, धोका वाढल्याने एक किलोमीटरच्या कक्षेतील कोंबड्या संपवणार
धाराशिवमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग, धोका वाढल्याने एक किलोमीटरच्या कक्षेतील कोंबड्या संपवणार
Virat Kohli : कोपिष्ट जमदग्नी असलेला विराट कोहली अचानक शांत झाला, स्ट्रॅटेजीत आमुलाग्र बदल; पाकिस्तान, ऑस्ट्रेलियानंतर आता न्यूझीलंडला दणका बसणार
विराट कोहलीनं रणनीती बदलली, विरोधी संघांची झोप उडाली, पाकिस्तान ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडला दणका बसणार
Maharashtra Live Updates: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पाचवा दिवस तर राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पाचवा दिवस तर राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Datta Gade News | आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेषातील फोटो समोर,पोलीस असल्याचं सांगून करायचा फसवणूकABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 06 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 7.30AM 06 March 2025 माझं गाव, माझा जिल्हाPrashant Koratkar Special Report | कार जप्त, 'कार'नाम्यांना ब्रेक? कोरटकरची कार आणि मोतेवार, कनेक्शन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranya Rao Arrest : थेट पोलिस महासंचालकाची लेक दुबईतून आणलेल्या 15 किलोच्या सोन्याच्या तस्करीत विमानतळावर सापडली; म्हणाले, 'माझ्या करिअरला आजवर डाग लागलेला नाही, पण...'
थेट पोलिस महासंचालकाची लेक दुबईतून आणलेल्या 15 किलोच्या सोन्याच्या तस्करीत विमानतळावर सापडली; म्हणाले, 'माझ्या करिअरला आजवर डाग लागलेला नाही, पण...'
Bird Flu : धाराशिवमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग, धोका वाढल्याने एक किलोमीटरच्या कक्षेतील कोंबड्या संपवणार
धाराशिवमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग, धोका वाढल्याने एक किलोमीटरच्या कक्षेतील कोंबड्या संपवणार
Virat Kohli : कोपिष्ट जमदग्नी असलेला विराट कोहली अचानक शांत झाला, स्ट्रॅटेजीत आमुलाग्र बदल; पाकिस्तान, ऑस्ट्रेलियानंतर आता न्यूझीलंडला दणका बसणार
विराट कोहलीनं रणनीती बदलली, विरोधी संघांची झोप उडाली, पाकिस्तान ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडला दणका बसणार
Maharashtra Live Updates: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पाचवा दिवस तर राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पाचवा दिवस तर राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Temperature Alert: उष्णतेचा कहर! आत्ताच 38°, येत्या 2 दिवसात महाराष्ट्र आणखी तापणार,IMD चा इशारा काय ?
उष्णतेचा कहर! आत्ताच 38°, येत्या 2 दिवसात महाराष्ट्र आणखी तापणार,IMD चा इशारा काय ?
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
Share Market : सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स अन् निफ्टीतील तेजीचं कारण समोर... 
सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स अन् निफ्टीत तेजी 
Pune Crime Dattatray Gade: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचा पोलिसांच्या वेषातील फोटो सापडला, मोडस ऑपरेंडीचा उलगडा झाला
मोठी बातमी: पुण्यातील नराधम दत्तात्रय गाडेचा तो फोटो अखेर सापडलाच, पोलीसही चक्रावले
Embed widget