एक्स्प्लोर
‘लाव रे तो व्हिडीओ’ ला भाजपकडून ‘आता बघाच तो व्हिडीओ’ने उत्तर, राज ठाकरेंच्या आरोपांवर भाजपचा खुलासा
सत्यावर राजकारण करणं आमची प्रवृत्ती तर खोट्यावर राजकारण करणं ही तुमची प्रकृती आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ‘मित्रा खरंच तू चुकलास’ असं सुरुवातीला म्हणत शेलार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवर खुलासा केला.
मुंबई : सध्या गाजत असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ला भाजपने आज ‘आता बघाच तो व्हिडीओ’ म्हणत उत्तर दिले आहे. राज ठाकरेंच्या पोलखोल सत्राला उत्तर देण्यासाठी भाजपचं ‘आता बघाच तो व्हिडीओ’ साठी सभेचे आयोजन केले. रंगशारदा सभागृहात दोन स्क्रीन लावून राज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवर खुलासा केला.
यावेळी आशिष शेलार म्हणाले की, राज ठाकरेंनी 32 खोट्या प्रकरणात आरोप केले. हे आरोप आरटीआयच्या माध्यमातून केले का? जे फुटेज घेतले ते भाजपच्या व्हेरिफाईड अकाउंटवरून घेतल्या का? ज्या बातम्या दाखवल्या त्या पूर्ण दाखवल्या का? , असे ते म्हणाले. अनव्हेरिफाईड सोर्सेस वापरून खोटे आरोप राज ठाकरेंनी केले आहेत, असेही ते म्हणाले. त्यामुळे आज त्यांची पोलखोल भाजप करणार आहे. सर्व प्रकरणावर उत्तर आहेत मात्र वेळेअभावी 19 प्रकरणांची उत्तरं आज देणार आहोत असे ते म्हणाले.
सत्यावर राजकारण करणं आमची प्रवृत्ती तर खोट्यावर राजकारण करणं ही तुमची प्रकृती आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ‘मित्रा खरंच तू चुकलास’ असं सुरुवातीला म्हणत शेलार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवर खुलासा केला.
राज ठाकरेंचे आरोप आणि भाजपचे खुलासे
1) आरोप : पत्रकार, संपादक, इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मुस्कटदाबी
- खुलासा : मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंविरोधात केलेल्या पोस्टसाठी काही लोकांचे मुस्काट फोडले. त्याचा व्हिडीओ दाखवला.
2) आरोप : अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेचे व्हिडिओ मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी असल्याचं दाखवलं
खुलासा : अनव्हेरिफाईड आणि भाजपशी संबंध नसलेल्या व्यक्तीच्या पोस्ट आणि एका वृत्तवाहिनीच्या बातमीच्या आधारावर केलेला आरोप खोटा. त्याचा व्हिडीओ दाखवला.
3) आरोप : मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाची दुर्दशा
खुलासा : एका वृत्तवाहिनीने बातमीत दाखवले की गावात किती सुधारणा झाली. त्याचा व्हिडीओ दाखवला.
4) आरोप : नमामी गंगेचा प्रकल्प फेल गेला
खुलासा : नमामी गंगा प्रकल्प किती योग्यरित्या राबवला याबाबतचा व्हिडीओ दाखवला
5) आरोप : नोटाबंदी हा ऐतिहासिक घोटाळा, झटक्यात घेतलेला निर्णय आहे.
खुलासा : जनतेशी आधी संवाद साधला, कर वसुली दुप्पट झाली. स्लाईडच्या आधारे आकडेवारी दाखवली
6) आरोप : देशातल्या प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देईन असे मोदी म्हणाले होते
खुलासा : चोर, लुटारूंचे पैसे आले तर गरिबांना 15 ते 20 लाख सहज मिळतील. मोदींच्या भाषणाची क्लिप दाखवली
7) आरोप : मोनिका मोरेला मदतीचा दिखावा केला मात्र नोकरी अद्याप मिळाली नाही.
खुलासा : मोनिकाच्या अपघातानंतर राज ठाकरे नव्हे तर आमचे खासदार मदतीला पुढे सरसावले. तिला हात दिले, परीक्षेला बसायला लेखनिक दिले. पण यावेळी मनसे कुठे होती. याबाबत राजकारण करताय याची लाज वाटते, असे शेलार म्हणाले.
8) आरोप : शेतकरी मेले तर निवडणुकीचा मुद्दा, मग जवान शहीद झाले तर निवडणुकीचा मुद्दा नाही? असा प्रश्न मोदी विचारतात.
खुलासा : मोदींची मुलाखतीचा सविस्तर व्हिडीओ दाखवून स्पष्ट केलं की कुठल्या संदर्भात मोदींनी ते उत्तर दिले. 'त्यामुळे काय बोलतोय हा माणूस?' असं विचारणाऱ्या राज ठाकरे यांना 'काय बोलतोय हा माणूस?' हे विचारण्याची वेळ आली, असे शेलार म्हणाले.
9) आरोप : मोदींच्या काळात 38 हजार बलात्कार झालेत
खुलासा : बलात्काराचा - 3 टक्के असा मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या भाषणात दावा केला होता. बलात्कारावर राजकारण करणं हीनता, असल्याचे शेलार म्हणाले.
10) आरोप : राहुल गांधी पप्पू है, असं लहान मुलीला मंचावर बोलवून बोलायला लावलं.
खुलासा : तर खऱ्या व्हिडीओत लहान मुलीने रामायण बोलून दाखवलंय. मात्र आवाज बदलून खोटा व्हिडीओ दाखवण्यात आला
11) आरोप : पुलवामा हल्ल्यानंतर अमित शहा यांनी सर्वात पहिली प्रतिक्रिया दिली आणि 250 लोक मारल्याची घोषणा केली.
खुलासा : 25 फेब्रुवारीला 5.22 मिनिटांनी पाकिस्तानच्या मेजर जनरलने ट्विट करून घोषित केले. त्यानंतर आपल्या सेना प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली. अमित शहा यांनी ट्वीट केलं 1.28 मिनिटांनी 26 फेब्रुवारीला.
12) आरोप : 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्याआधी 27 डिसेंबरला अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार यांची थायलंडमध्ये गुप्त बैठक झाली.
खुलासा : डिसेंबर कुठला हे त्यांनी सांगितले नाही आणि लोकांची दिशाभूल केली. 2018 च्या 26 डिसेंबरला बैठक झाल्याची बातमी दाखवली. ही भेट कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आईला भेटता यावं यासाठी झाली.
13) आरोप : अमेरिकेने दिलेली सर्व F-16 विमानं जशास तशी आहेत
खुलासा : एका बातमीच्या आधारावर स्पष्ट केले की अमेरिका याबाबत काहीच माहिती नाही. पाडलेल्या विमानाचे अवशेष दाखवताना लष्करी अधिकाऱ्यांचा व्हिडीओ दाखवला
14) आरोप : सुषमा स्वराज यांचं वक्तव्य की पाकिस्तानी सेनेला धक्का लागता कामा नये पण आतंकवादी अड्डे उध्वस्त करा.
खुलासा : सुषमा स्वराज यांचा व्हिडीओ ज्यात त्या सेनेला सूट दिली असली तरी पाकिस्तानी जनतेला त्रास व्हायला नको अशा सूचना दिल्या होत्या. अड्ड्यावर फक्त आतंकवाद्यांना मारलं, नागरिकांना नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement