Bhandara Assembly Election : भंडारा जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? 3 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Bhandara Assembly Election : यंदा तिनही मतदारसंघाच्या लढती या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यातच नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून रिंगणात आहेत.
Bhandara District Vidhan Sabha Election 2024 : गोंदिया (Bhandara Assembly Election 2024) हा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला आहे. त्यामुळे भंडाऱ्याची ओळख देश पातळीवरच्या राजकारणात आहे. भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र तर गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र आहे.भात उत्पादक जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची संपूर्ण राज्यात ओळख आहे. येथील उत्पादित तांदळाची देशभरात विक्री होते. भातासोबतच भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ही ओळखला जातो. या तलावांसोबतच गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प या जिल्ह्यात आहे. यंदा तिनही मतदारसंघाच्या लढती या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यातच नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचीही उत्सुकता आहे.
मतदारसंघ | महायुती | महाविकास आघाडी | अपक्ष |
भंडारा | नरेंद्र भोंडेकर | पूजा ठावकर | अश्विनी लांडगे |
साकोली | अविनाश ब्राह्मणकर | नाना पटोले | |
तुमसर | राजू कारेमोरे | चरण वाघमारे |
भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
भंडारा
भंडारा मतदारसंघात महायुतीकडून नरेंद्र भोंडेकर हे रिंगणात आहेत त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून पूजा ठावकर मैदानात आहेत. अश्विनी लांडगे या अपक्ष उमेदवार आहेत.
साकोली
साकोली मतदारसंघात अविनाश ब्राह्मणकर उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.
तुमसर
महायुतीचे राजू कारेमोरे हे उमेदवार आहेत. तसेच महाविकास आघाडीकडून चरण वाघमारे रिंगणात आहेत.
2019 मध्ये अशी झाली होती लढत
2019 मध्ये सर्वच पक्ष वेगवेगळे लढले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र लढलेत तर शिवसेना, भाजप ही वेगवेगळी लढली होती. काँग्रेसकडून भंडाऱ्याची उमेदवारी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे यांना देण्यात आली होती. तर, भाजपकडून अरविंद भालाधरे आणि अपक्ष म्हणून नरेंद्र भोंडेकर यांनी निवडणूक लढवली. यात नरेंद्र भोंडेकर यांनी विजयी मिळविला. सध्या ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत.
यावेळी दिसणार वेगळं चित्र?
सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असून त्यांच्या वतीने भंडाऱ्याची जागा शिवसेनेच्या गटात देऊन पुन्हा एकदा नरेंद्र भोंडेकर यांना महायुतीचे उमेदवार बघितले जात आहे. यासोबतच काँग्रेसमध्येही अनेक इच्छुक आहेत. सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही अनेकांनी उमेदवारीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.