Sangli Assembly Election : सांगली जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? 8 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Sangli District Vidhan Sabha Election 2024 : सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या 8 जागा आहेत. या आठ जागांवर काट्याची लढाई होत आहे.
Sangli District Vidhan Sabha Election 2024 : राजकीय घडामोडीचं केंद्र म्हणून सांगली जिल्हा परिचीत आहेत. या जिल्ह्यात अनेक मंत्री, मुख्यमंत्री झाले आहेत. वसंतदादा पाटील, आर आर पाटील, पतंगराव कदम यांच्यासारखे दिग्गज नेत्यांपासून, जयंत पाटील, विश्वजीत कदम , सुरेश खाडे, रोहित पाटील अशा नेत्यांपर्यंत सांगली जिल्ह्यात बड्या नेत्यांची फौज आहे. सांगली जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ (Sangl District Vidhan Sabha Election) आहेत. तर एक लोकसभा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Sangli Lok Sabha Election Result 2024) इथे अपक्ष विशाल पाटील (Vishal Patil) विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्यात लढत झाली. यामध्ये विशाल पाटील यांनी बाजी मारली. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 3, काँग्रेस 2, भाजप 2, शिवसेना 1 जागा मिळाली होती. आता सांगलीत 2024 विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महायुती उमदेवार | महाविकास आघाडी | वंचित/अपक्ष/इतर | विजयी उमेदवार |
1 | सांगली विधानसभा | सुधीर गाडगीळ (भाजप) | पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) | जयश्रीताई पाटील (अपक्ष) | |
2 | मिरज विधानसभा | सुरेश खाडे | तानाजी सातपुते | विज्ञान माने (वंचित) | |
3 | तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा | संजय काका पाटील (NCP- AP) | रोहित पाटील (NCP-SP) | ||
4 | खानापूर विधानसभा | सुहास बाबर (शिवसेना-शिंदे) | वैभव पाटील (NCP-SP) | राजेंद्र अण्णा देशमुख (अपक्ष) | |
5 | पलूस कडेगाव विधानसभा | डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस) | संग्रामसिंह देशमुख (भाजप) | ||
6 | शिराळा विधानसभा | मानसिंगराव नाईक (NCP-SP) | सत्यजित देशमुख (भाजप) | ||
7 | इस्लामपूर विधानसभा | जयंत पाटील (NCP-SP) | निशिकांत पाटील (NCP- AP) | ||
8 | जत विधानसभा | विक्रम सावंत (काँग्रेस) | गोपीचंद पडळकर (भाजप) | तमनगौडा रवी पाटील (अपक्ष) |
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
1) सांगली विधानसभा
भाजपचे सुधीर गाडगीळ विरुद्ध काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील विरुद्ध कॉंग्रेस नेत्या अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील
2) मिरज विधानसभा
भाजपचे सुरेश खाडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने
3) तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संजय काका पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रोहित पाटील
४) खानापूर विधानसभा
शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास बाबर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख
५) पलूस कडेगाव विधानसभा
काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम विरुद्ध भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख
६) शिराळा विधानसभा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजपचे सत्यजित देशमुख
७) इस्लामपूर विधानसभा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील विरुद्ध अजित पवार यांच्या गटांकडून राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील
८) जत विधानसभा
काँग्रेसचे विक्रम सावंत विरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर विरुद्ध भाजपमधून बंडखोरी केलेले अपक्ष तमनगौडा रवी पाटील
संबंधित बातम्या