एक्स्प्लोर

Beed Gram Panchayat Election : ॲम्बुलन्समधून येऊन बाळंतिणीने सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला

Beed Gram Panchayat Election : सौ. पल्लवी माने यांची काही दिवसांपूर्वीच प्रसुती झाली. मात्र आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या बाळासह ॲम्बुलन्समधूनच उमेदवारी दाखल करण्यासाठी आल्या होत्या

Beed Gram Panchayat Election : राज्यात सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरु आहे. गावगाड्याचे इच्छुक कारभारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यामध्ये अनेक लक्षवेधी घटना समोर येताना दिसत आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातील परळीमध्ये आज (2 डिसेंबर) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका महिला उमेदवाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचे चित्र दिसून आले. काही दिवसांपूर्वीच प्रसुती (Delivery) झालेल्या एका महिला उमेदवाराने ॲम्बुलन्समधून (Ambulance) येत सरपंचपदासाठी (Sarpanch) अर्ज भरला आहे.
      
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अंतिम दिवस आहे. या निवडणुकीसाठी वानटाकळी गावाच्या सरपंचपदाच्या इच्छुक उमेदवार सौ. पल्लवी अरुण माने या चक्क ॲम्बुलन्समधून आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झाल्या. सौ. पल्लवी माने यांची काही दिवसांपूर्वीच प्रसुती झाली आहे. मात्र आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या स्वतः आपल्या कुटुंब आणि कार्यकर्त्यांसह चक्क ॲम्बुलन्समधूनच उमेदवारी दाखल करण्यासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांचं नवजात बाळही सोबत होतं. ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना परळीत लक्षवेधी ठरली आहे.

PHOTO: राज्यभरात भावी सरपंचांनी काढली रात्र जागून, कारण होतं...

ऑफलाईन अर्ज भरतानाही अडचणी, वेळ वाढवून देण्याची उमेदवारांची मागणी
ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शासनाकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ऑफलाईन अर्ज स्वीकारताना देखील अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. बीडमधल्या शासकीय आयटीआयमध्ये अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी गर्दी केली आहे तर आष्टीमध्ये अर्ज स्वीकारण्यात येणाऱ्या ठिकाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी जरी मुभा दिली असली तरी देखील सायंकाळी पाच वाजेपर्यंतच हे अर्ज भरावे लागणार आहेत. त्यामुळे आणखी  वेळ वाढवून देण्याची मागणी उमेदवार करत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस
बीड जिल्ह्यात होत असलेल्या 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी एकूण 1 हजार 998 अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले असून सदस्यपदासाठी 8 हजार 591 अर्ज दाखल झाले आहेत. 5 डिसेंबर रोजी या अर्जांची छाननी होईल आणि 7 डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून गावांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषणABP Majha Headlines : 01 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget