एक्स्प्लोर

बाळापूर विधानसभा मतदारसंघ : सगळ्याच पक्षांमधून उमेदवारांची भाऊगर्दी

बाळापूर मतदारसंघ अतिशय गुंतागुंतीचा आणि विकासापासून कोसो दूर आहे. पश्चिम विदर्भातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो. या मतदारसंघातील महत्वाच्या समस्या तशाच असतांना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने सकारात्मक प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत. स

अकोला : बाळापूर हे विदर्भातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे. कधीकाळी मुघलांची या भागातील राजधानी म्हणून बाळापूर ओळखले जाते. ऐतिहासिक वारशांनी समृद्ध असलेल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहासही काहीसा वेगळ्या वाटेणे जाणारा आहे. अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापूर विधानसभा मतदारसंघ. कारण गेल्या 30 वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व दिले आहे. सलग दुसऱ्यांदा निवडून न येण्याचा पायंडा भारिपच्या बळीराम सिरस्कारांनी मागच्या निवडणुकीत मोडीत काढला. परंतु तिसऱ्यांदा निवडून येण्याआधी त्यांच्या मार्गात उमेदवारी मिळण्याचा मोठा 'अडसर' आहे. अशीच स्थिती सर्वच पक्षांतील इच्छूकांसंदर्भात आहे. त्यामूळे या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचे चित्र अद्यापही काहीसे धुसर आहे. महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे तर आघाडीत काँग्रेसकडे आहे. मात्र, महायुतीत शिवसेना आणि शिवसंग्रामने येथे दावा केला आहे. तर आघाडीत राष्ट्रवादीनं या मतदारसंघासाठी जोरदार आग्रह धरला आहे. 2014 मध्ये भाजप, शिवसेना आणि शिवसंग्रामच्या मतविभाजनातून येथे सलग दुसऱ्यांदा भारिप-बहुजन महासंघाच्या बळीराम सिरस्कार यांना लॉटरी लागली होतीसिरस्कार हे 6 हजार 939 मतांनी विजयी झाले होते. 2014 मधील निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते बळीराम सिरस्कार : भारिप-बमसं : 41,426 मतं नातिकोद्दीन खतिब: काँग्रेस : 34,487 मतं तेजराव थोरात : भाजप : 30,741 मतं संदीप पाटील : अपक्ष : 18,547 मतं कालिंग लांडे : शिवसेना : 6,722 मतं बळीराम सिरस्कार : भारिप-बमसं : 6,939 मतांनी विजयी बाळापूर या मतदारसंघात बाळापूर आणि पातुर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात 2 लाख 93 हजार 976 मतदार आहेत. या मतदारसंघात मुस्लिम, मराठा, कुणबी आणि माळी मतांचे प्रमाण मोठे आहे. बाळापूर मतदारसंघात मुस्लिम मतदार हे निर्णायक भूमिका बजावतात. मात्र, या मतदारसंघाने नेहमीच जातीच्या पलीकडे जात निवडणूक निकाल दिले आहेत. प्रत्येकवेळी नवीन चेहऱ्याला संधी देणारा हा मतदारसंघ आहे. कधी भाजप, कधी कॉंग्रेस तर कधी भारिप-बहुजन महासंघ अशा नवनवीन पक्षांना संधी देणारा हा मतदारसंघ आहे. 2014 च्या निवडणुकीत सिरस्कारांनी बाजी मारत आमदार रिपीट न करण्याची या मतदारसंघाची परंपरा खंडीत केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात प्रमूख उमेदवारांना मिळालेली मतं 1. संजय धोत्रे : भाजप : 80,488 मतं 2. प्रकाश आंबेडकर : वंचित बहूजन आघाडी : 56,981 मतं 3. हिदायत पटेल : काँग्रेस : 48,061 मतं मताधिक्य : संजय धोत्रे : भाजप : 23,507 मतं बाळापूर मतदारसंघाचे वंचितकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रमुख दावेदारांमध्ये पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. रहेमान खान यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. भाजपकडून गेल्या वेळचे उमेदवार आणि जिल्हाधक्ष तेजराव थोरात, मध्यंतरी काँग्रेसमध्ये जावून 'घरवापसी' केलेले माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल आणि जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण मोरखडे यांची नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचंही नाव उमेदवार म्हणून समोर येऊ शकतं. महायुतीमध्ये या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. पाचपैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामूळे सध्या वंचितच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ सेनेला देण्याचे भाजपनं जवळपास निश्चित केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हे तीन वर्षांपासून येथे तयारी करीत आहेत. त्यांनी गावागावांत सेनेचं संघटन उभं करीत मतदारसंघात अनेक आंदोलनंही केली आहेत. विशेष म्हणजे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे खास असलेल्या देशमुखांना भाजपकडूनही मदतीची मोठी रसद मिळू शकते. याशिवाय युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांचीही सेनेच्या उमेदवारीसाठी दावेदारी आहे. महायुतीतील दुसरा पक्ष शिवसंग्रामचे संदीप पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ विनायक मेटेंनी भाजपकडे मागितला आहे. 2014 च्या निवडणुकीत पक्षाकडून 'शिवसंग्राम'च्या नावानं आलेल्या 'एबी फॉर्म'ला केराची टोपली दाखवत भाजपने स्वत:चा उमेदवार उभा केला होता. त्यामूळे शिवसंग्रामच्या संदीप पाटलांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती आणि 18 हजारांवर मतं घेतली होती. यावेळीही संदीप पाटील शिवसंग्रामकडून उमेदवारीचे दावेदार आहेत. मात्र, संदीप पाटील यांची पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याशी 'खास' जवळीक आहे. गेल्या पाच वर्षांत संदीप पाटलांनी संजय धोत्रेंना केलेल्या विरोधामूळे धोत्रे गटाची नाराजी त्यांना भोवण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसकडून बाळापूर शहरावर एकहाती सत्ता गाजविणारे माजी आमदार नातिकोद्दिन खतीब हे दावेदार आहेत. मात्र, पतसंस्थेतील घोळामूळे अडचणीत आल्याने ते मुलगा ऐनोद्दीन खतीब याला उमेदवारीसाठी पुढे करु शकतात. याशिवाय काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे आणि प्रकाश तायडे यांचीही नावे काँग्रेसकडून चर्चेत आहेत. आघाडीत काँग्रेसकडे असलेल्या या मतदारसंघावर आता राष्ट्रवादीने दावा केला आहे. काँग्रेस येथे सातत्याने पराभूत होत असल्यानं राष्ट्रवादी येथे नशीब आजमावण्याचा विचार करीत आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख दावेदारांमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, गतवेळचे उमेदवार हिदायतखाँ रुमखा आणि शिवाजी म्हैसने यांचा समावेश आहे. राजकीय पक्षांचे प्रमुख दावेदार 1. वंचित बहूजन आघाडी : विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार, डॉ. धैर्यवधन पूंडकर, डॉ. रहेमान खान 2. भाजप : जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल, श्रीकृष्ण मोरखडे 3. शिवसेना : जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप 4. काँग्रेस : माजी आमदार नातिकोद्दीन खतिब, बाळापूर नगराध्यक्ष ऐनोद्दीन खतिब, डॉ. सुधीर ढोणे, प्रकाश तायडे 5. राष्ट्रवादी : जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, शिवाजी म्हैसने. 6. शिवसंग्राम : संदीप पाटील. हा मतदारसंघ अतिशय गुंतागुंतीचा आणि विकासापासून कोसो दूर आहे. पश्चिम विदर्भातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो. या मतदारसंघातील महत्वाच्या समस्या तशाच असतांना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने सकारात्मक प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत. सध्या या मतदारसंघातील महत्वाचा प्रश्न म्हणजे बाळापूर शहरातील रस्ते आणि अतिक्रमण. पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्प सोडला तर इतर कोणताच महत्वाचा प्रकल्प मतदारसंघात नाही. बाळापूर आणि पातूर ही ऐतिहासिक शहरं असूनही येथील ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. 'मन' आणि 'म्हस' नदीकाठावर वीटभट्टी धारकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आगे. याशिवाय मतदारसंघातील खराब रस्त्यांची समस्या आजही अगदी तशीच आहे. मतदारसंघातील प्रमुख प्रश्न 1. औद्योगिक मागासलेपण. 2. ऐतिहासिक बाळापूर आणि पातूरकडे पर्यटन स्थळ म्हणून दुर्लक्ष 3. मतदारसंघातील रस्ते आणि अतिक्रमण 4. रोजगाराच्या संधी 5. कृषीवर आधारित उद्योगाची वाणवा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
तिकडे अमेरिकेची तैवानला शस्त्र पुरवण्याची घोषणा, इकडून चीनचा दणका, 20 अमेरिकन कंपन्यांवर बंदी, मालमत्ता गोठवली
चीनचा जोरदार धक्का, अमेरिकेच्या  20 कंपन्यांवर घातली बंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
Meenakshi Shinde: ठाण्यात मीनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा भिरकावला, अन् एकनाथ शिंदेंनी सुद्धा फोनाफोनी करत निरोप धाडला!
ठाण्यात मीनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा भिरकावला, अन् एकनाथ शिंदेंनी सुद्धा फोनाफोनी करत निरोप धाडला!
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

व्हिडीओ

Jayant Patil Meets Uddhav Thackeray मुंबईत मविआ एकत्र यावी अशी इच्छा, अनेक मुद्यावर सकारात्मक चर्चा
Prakash Mahajan on Raj Uddhav Thackeray Yuti : अंधारात एकट्यापेक्षा दोघे जाऊ, ठाकरेंच्या युतीवर टीका
Shiv Sainik on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंनी कमर्शियल पद्धतीने तिकीटे वाटली, शिवसैनिकांचा आरोप
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
तिकडे अमेरिकेची तैवानला शस्त्र पुरवण्याची घोषणा, इकडून चीनचा दणका, 20 अमेरिकन कंपन्यांवर बंदी, मालमत्ता गोठवली
चीनचा जोरदार धक्का, अमेरिकेच्या  20 कंपन्यांवर घातली बंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
Meenakshi Shinde: ठाण्यात मीनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा भिरकावला, अन् एकनाथ शिंदेंनी सुद्धा फोनाफोनी करत निरोप धाडला!
ठाण्यात मीनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा भिरकावला, अन् एकनाथ शिंदेंनी सुद्धा फोनाफोनी करत निरोप धाडला!
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'थाटामाटात लग्न होऊन दीड वर्ष झालं, माझे दाजी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच नाहीत, दररोज काहीतरी गंडवागंडवी करतात'; बहिणीसाठी मेव्हणा पोहोचला पोलिस स्टेशनला पण..
'थाटामाटात लग्न होऊन दीड वर्ष झालं, माझे दाजी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच नाहीत, दररोज काहीतरी गंडवागंडवी करतात'; बहिणीसाठी मेव्हणा पोहोचला पोलिस स्टेशनला पण..
Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?
अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?
Kolhapur Municipal Corporation Election: इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सतेज पाटलांचा हल्लाबोल
महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सतेज पाटलांचा हल्लाबोल
Embed widget