एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

माझं पक्षात कुणीही ऐकत नाही, अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत?

चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यामध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरु असताना अशोक चव्हाण हे मी स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे, असे बोलल्याचा संवाद आहे.

मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भात त्यांचीच एक ऑडीओ  क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे आमचे काम आहे, मी क्लिप ऐकलेली नाही, असे चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.
चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची ऑडीओ  क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यामध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरु असताना अशोक चव्हाण हे मी स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे, असे बोलल्याचा संवाद आहे.
WATCH VIDEO | नवीनचंद्र बांदिवडेकरच काँग्रेसचे उमेदवार, काँग्रेसकडून पाठराखण | एबीपी माझा
या विषयवार बोलताना अशोक चव्हाण म्हटले की, खाजगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. हे अंतर्गत  विषय आहेत. चंद्रपूरमध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत, कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे माझे काम आहे.  मी क्लिप ऐकलेली नाही, चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय आहेत. कार्यकर्ते नाराज आहेत, असेही ते म्हणाले.
चंद्रपूर लोकसभेतून  विनायक बांगडे  यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
बांदिवडेकर यांच्याबाबतचं वादळ शमलं, उमेदवारी कायम : अशोक चव्हाण
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. बांदिवडेकरांचा 'सनातन संस्थे'शी संबंध असल्याचा आरोप झाल्याने त्यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षातून करण्यात येत होती. मात्र ही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. "आम्ही बांदिवडेकरांबाबत सखोल चौकशी केलेली असून त्यांचा देखील खुलासा प्राप्त झाला आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेलं वादळ शमलेलं आहे. त्यांची उमेदवारी कायम आहे", अशी माहिती चव्हाण यांनी 'एबीपी माझा' सोबत बोलताना दिली आहे. बांदिवडेकर यांच्यावर वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारा येथील स्थानिक नागरिकांनी काढलेल्या रॅलीत सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर सनातन ही जातीयवाद संस्था आहे, मात्र मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने कोणत्याही एका जातीसाठी करत नाही. माझा सनातन संस्थेशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण बांदिवडेकर यांनी दिलं होतं.
राज्यात अशा असतील थेट लढती 1.    सोलापूर- सुशीलकुमार शिंदे (CONG) विरुद्ध  जयसिध्देश्वराय स्वामी (BJP) 2.    बारामती- सुप्रिया सुळे (NCP) विरुद्ध  कांचन कुल ( BJP) 3.    दिंडोरी-  धनराज महाले (NCP) विरुद्ध  डॉ.भारती पवार ( BJP) 4.    चंद्रपूर- विनायक बांगडे  ( CONG) विरुद्ध  हंसराज अहिर (BJP) 5.    भिवंडी-  सुरेश तावरे ( CONG) विरुद्ध  कपिल पाटील (BJP) 6.    औरंगाबाद- सुभाष झांबड (CONG) विरुद्ध  चंद्रकांत खैरे ( SENA) 7.    जालना- विलास औताडे ( CONG) विरुद्ध  रावसाहेब दानवे (BJP) 8.    लातूर-  मच्छिंद्र कामंत ( CONG) विरुद्ध  डॉ. सुधाकर शृंगारे (BJP) 9.    नाशिक- समिर भुजबळ(NCP) विरुद्ध  हेमंत गोडसे (SENA) 10.    बुलडाणा-  राजेंद्र शिंगणे( NCP) विरुद्ध  प्रतापराव जाधव (SENA) 11.    यवतमाळ- माणिकराव ठाकरे (CONG) विरुद्ध  भावना गवळी ( SENA) 12.    रायगड-  सुनिल तटकरे(NCP)  विरुद्ध  अनंत गिते (SENA) 13.    कल्याण- बाबाजी पाटील(NCP) विरुद्ध  श्रीकांत शिंदे (SENA) 14.    ठाणे- आनंद परांजपे(NCP) विरुद्ध  राजन विचारे (SENA) 15.    मुंबई दक्षिण मध्य-  एकनाथ गायकवाड (CONG) विरुद्ध  राहुल शेवाळे (SENA) 16.    मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा (CONG) विरुद्ध  अरविंद सावंत (SENA) 17.    मावळ- पार्थ पवार(NCP) विरुद्ध  श्रीरंग बारणे( SENA) 18.    शिरुर- अमोल कोल्हे(NCP) विरुद्ध  शिवाजीराव आढळराव (SENA) 19.    शिर्डी- भाऊसाहेब कांबळे (CONG) विरुद्ध  सदाशिव लोखंडे (SENA) 20.    कोल्हापूर- धनंजय महाडिक(NCP) विरुद्ध  संजय मंडलिक (SENA) 21.    हातकणंगले- राजू शेट्टी ( स्वाशेसं)  विरुद्ध  धर्यशील माने (SENA) 22.    परभणी- राजेश विटेकर (NCP) विरुद्ध  संजय जाधव (SENA) 23.    नंदुरबार ( एसटी)-  के. सी पाडवी (CONG) विरुद्ध  हिना गावित (BJP)- 24.    धुळे-  कुणाल पाटील (CONG) विरुद्ध  डॉ. सुभाष भामरे (BJP) – 25.    वर्धा- चारुलता टोकस (CONG) विरुद्ध  रामदास तडस (BJP) – 26.    नागपूर-  नाना पटोले (CONG) विरुद्ध  नितीन गडकरी (BJP) – 27.    गडचिरोली-  डॉ. नामदेव उसेंडी( CONG)  विरुद्ध  अशोक  नेते 28.    मुंबई- उत्तर-मध्य-  प्रिया दत्त (CONG) विरुद्ध  पूनम महाजन (BJP) 29.    अहमदनगर-  संग्राम जगताप (NCP) विरुद्ध  डॉ. सुजय विखे पाटील (BJP) 30.    बीड-   डॉ. प्रीतम मुंडे (BJP) विरुद्ध  बजरंग सोनवणे(NCP) संबंधित बातम्या लोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा
लोकसभा निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा
काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराजRamdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Embed widget