एक्स्प्लोर
पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी अशोक चव्हाणांनीच 'ती' ऑडिओ क्लिप वायरल केली, विनोद तावडेंचा आरोप
पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चंद्रपूरच्या उमेदवारीबाबत पक्षात नाराजी असल्याची ऑडिओ क्लिप स्वतःच वायरल केली, असा आरोप राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
मुंबई : पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चंद्रपूरच्या उमेदवारीबाबत पक्षात नाराजी असल्याची ऑडिओ क्लिप स्वतःच वायरल केली, असा आरोप राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची 'तोंडी परीक्षा' हा कार्यक्रम आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर प्रसारित होणार आहे.
अशोक चव्हाण नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भात त्यांचीच एक ऑडिओ क्लिप नुकतीच वायरल झाली होती. चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची ही ऑडिओ क्लिप होती. काँग्रेस हायकमांडवर दबाव आणुन तिकीट बदलायला लावण्यासाठी ही क्लिप अशोक चव्हाण यांनी स्वतःच रेकॉर्ड करायला सांगितली आणि वायरल केली आहे, असा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे. तसेच अब्दुल सत्तार हे चव्हाणांच्या जवळचे असून त्यांच्याच सांगण्यावरुन सत्तार यांनी राजीनामा दिला आहे, असं देखील तावडे म्हणाले.
VIDEO | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नाराज, ऑडिओ क्लिप वायरल | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement