एक्स्प्लोर

Andheri : ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; उद्या सकाळी 11 पर्यंत राजीनामा स्वीकारा, न्यायालयाचा पालिकेला आदेश

Andheri East Bypoll 2022 : उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. शुक्रवारी सकाळी 11 पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयाने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीने सुनावणी झाली. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा 2 सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने सांगितले.

ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत असून एखादा कर्मचारी राजीनामा देऊन निवडणूक लढवत असेल तर काय अडचण आहे असा सवाल न्यायालयाने पालिकेला विचारला. त्यावर सविस्तर उत्तर देण्याचे निर्देशही दिले. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आम्हाला हस्तक्षेप करावा लागत असल्याचं सांगत न्यायालयाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल दिला. महापालिकेने ऋतुजा लटके यांच्या राजीनामा सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll 2022) ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचं काय होणार याबद्दल संदिग्धता होती. 

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण देताना पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 30 दिवसात हा राजीनामा स्वीकारला जाईल असं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावर ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल देताना त्यांचा राजीनामा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा असे निर्देश दिले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pilgrimage Rush: दक्षिण काशी Harihareshwar मध्ये भक्तांचा महासागर, कार्तिक एकादशी यात्रेला प्रारंभ
Lonar Lake Pollution : लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात, शासनाने तोडगा काढावा
Women's World Cup Final: Team India इतिहास रचणार? जिंकल्यास BCCI देणार 125 कोटींचे बक्षीस
World Cup Cricket : महिला वर्ल्ड कप फायनल, टीम इंडिया जिंकणारच, चाहत्यांना पूर्ण विश्वास
IND-W vs SA-W Final: अमोल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया विश्वविजयासाठी सज्ज, पावसाचं सावट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
Nashik Politics: पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
India Women vs South Africa Women, Final: कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
केन विल्यम्सनच्या तडकाफडकी निर्णयानं भूवया उंचावल्या! टी-20मध्ये न्यूझीलंडला दोनदा सेमीफायनल अन् एकदा फायनल गाठून दिली!
केन विल्यम्सनच्या तडकाफडकी निर्णयानं भूवया उंचावल्या! टी-20मध्ये न्यूझीलंडला दोनदा सेमीफायनल अन् एकदा फायनल गाठून दिली!
Crime News: 15 वर्षांच्या मुलाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने वार करून संपवलं; गर्भवती वहिनीसोबत नको ते केलं, आईनंही केली मदत, पुरलेले मृतदेह...
15 वर्षांच्या मुलाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने वार करून संपवलं; गर्भवती वहिनीसोबत नको ते केलं, आईनंही केली मदत, पुरलेले मृतदेह...
Embed widget