एक्स्प्लोर

Amravati Loksabha : तिरंगी लढतीत नवनीत राणा बाजी मारणार, दुसऱ्यांदा लोकसभा गाठणार, पोलस्ट्राट एक्झिट पोलचा अंदाज

Amravati Loksabha :  लोकसभा निवडणुकीबाबतचा 'टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स'चा एक्झिट पोल समोर आलाय.

Amravati Loksabha :  लोकसभा निवडणुकीबाबतचा 'टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स'चा एक्झिट पोल समोर आलाय. महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढतीबाबतही अंदाज समोर आले आहेत. अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघातून भाजपच्या नवनीत राणा  बाजी मारताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे या मतदारसंघात पिछाडीवर जाताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करतानाच नवनीत राणांना (Navneet Rana) यश मिळण्याची शक्यता आहे. 

उमेदवारी मिळवण्यासाठी नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश

नवनीत राणा (Navneet Rana) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी सातत्याने भाजप पुरस्कृत भूमिका घेतली. शिवाय हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर राणांनी थेट उद्धव ठाकरेंशी पंगा घेतला होता. त्यामुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. दरम्यान, महायुतीकडून निवडणूक लढवली. मात्र, राणांना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा विरोध असल्याचेही बोलले गेले. 

अमरावतीमध्ये तिरंगी लढत 

अमरावती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. भाजपने नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस बळवंत वानखेडे यांना मैदानात उतरवले होते. तर दुसरीकडे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही दिनेश बूब यांना उमेदवारी देत तिरंगी लढत केली होती. बच्चू कडू यांनी सभेच्या मैदानावर थेट भाजपशी पंगाही घेतला होता. मात्र, दिनेश बूब यांच्या उमेदवारीचा फायदा नेमका कोणाला होतो याकडे सर्वांचे लक्ष होते. सध्या तरी एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नवनीत राणा आघाडी घेताना दिसत आहेत. 

तिरंगी लढत असल्याने दिनेश बूब नवनीत राणांची मतं कमी करणार की, बळवंत वानखेंडेना धक्का देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, लहान मुलाला जरी विचारलं तरी सांगेन की नवनीत राणांचा पराभव होईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत बच्चू कडू यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Beed Loksabha Exit Poll 2024 : पंकजा मुंडे की बजरंग सोनावणे, बीड लोकसभा मतदारसंघात कुणाची बाजी? एक्झिट पोलमध्ये पंकजताई आघाडीवर

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget