एक्स्प्लोर

Ajit Pawar: आधी 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध, आता मुंबईतील मोदींच्या सभेलाही जाणार नाही, अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर संध्याकाळी सहा वाजता सभा पार पडणार आहे.

Narendra Modi Rally Mumbai Ajit Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथे जाहीर सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांची संध्याकाळी सहा वाजता सभा पार पडणार आहे. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा मोदी आज घेणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार नरेंद्र मोदींच्या मुंबईतील या सभेला गैहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल मुंबईतील सभेला नसतील, असं सांगण्यात येत आहे. मात्र असे असलं तरी अजित पवारांचं नरेंद्र मोदींच्या सभेला गैहजर राहण्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कालच अजित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना बटेंगे तो कटेंगे हा नारा आम्हाला मान्य नाही, असं म्हटलं होतं. आम्ही शाहू,फुले आंबेडकरांच्या विचारसणीने जाणारा पक्ष आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज अजित पवार नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित राहणार नसल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 14 नोव्हेंबर 2024 रोजीचे कार्यक्रम-

-सकाळी 11 वाजता निफाड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ सभा ( पिंपळगाव हायस्कूल मैदान पिंपळगाव बसवंत ता. निफाड जि. नाशिक ) 

-दुपारी 1.30 वाजता दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ सभा ( खंडेराव मंदिर मौजे कसबेवणी वस्ती ता. दिंडोरी, जि. नाशिक ) 

-सायंकाळी 4 वाजता सिन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ सभा (तहसील कार्यालय मैदान सिन्नर ता. सिन्नर, जि. नाशिक)

-सायंकाळी 5.30 वाजता अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ सभा (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव जि. अहिल्यानगर)

भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान-

भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. हा विशेष संवाद नमो ॲपच्या माध्यमातून वऑनलाइन पद्धतीनं साधला जाईल. येत्या 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपने आपल्या गोटातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशानं या महत्त्वपूर्ण उपक्रमाची आखणी केली आहे. या संवादाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या निवडणूक रणनितीला बळकटी देतील आणि बुथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा-निर्देश देतील.

शिवाजी पार्कवर तोफा; अजितदादांची पाठ?, Video:

संबंधित बातमी:

MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Embed widget