(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Worli Vidhan Sabha constituency: वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे Vs संदीप देशपांडे Vs मिलिंद देवरा अशी तिरंगी लढत आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीत राज्यातील हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक असलेल्या वरळीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाने राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांना रिंगणात उतरवले आहे. याच मिलिंद देवरा यांच्यावर मनसेच्या (MNS) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी बुधवारी झालेल्या सभेत जोरदार टीका केली. यावेळी संदीप देशपांडे यांनी मराठी कार्ड बाहेर काढत मिलिंद देवरा यांना लक्ष्य केले.
मिलिंद देवरा यांना आजवर निवडणूक लढताना वरळीत (Worli Vidhan Sabha constituency) कधीच लीड मिळाले नाही. मिलिं देवरा हे मतदारसंघात सध्या भांडी वाटत आहेत. मात्र, यांनाच वरळीकर भांडी घासायला लावतील. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा म्हणाले होते की, मुंबई तुमची भांडी घासा आमची. यांना तुम्ही निवडून देणार का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना संदीप देशपांडे यांनी 'मराठी कार्ड' बाहेर काढत स्थानिकांना साद घातली आहे. यावर आता मिलिंद देवरा हे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संदीप देशपांडेंची ठाकरे गटावर जोरदार टीका
महाविकास आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना प्रचारासाठी आणले होते. वरळीत तेलुगु मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांना साद घालण्यासाठी मविआने रेवंत रेड्डी यांच्याकडून वरळीत प्रचार करुन घेतला. या मुद्द्यावरुन संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, वरळीत तेलंगणाचे मुख्यमंत्री प्रचाराला आले होते, काय झालं फाटली का ? एक काळ असा होता की बाळासाहेब ठाकरेंना बाहेरच्या राज्यात भाषणासाठी बोलवलं जायचे. आज परिस्थिती अशी आहे की, ठाकरे गटाला तेलंगणातून एखाद्या नेत्याला प्रचारासाठी बोलवावं लागत आहे. आधी यांनी 'केम छो वरळी' लिहिले, आता तेलगू मतदारांच्या मागे लागले आहेत, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले.
आदित्य ठाकरे वरळीत मुस्लीम मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. जेव्हा गरज संपेल तेव्हा आदित्य ठाकरे यांनाही बाजूला करतील. यांना कोणाबद्दलही प्रेम नाही, यांना फक्त यांच्या कुटुंबाबद्दल प्रेम आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
बीडीडी चाळीच्या उंच इमारतींचा मेंटेनन्स मराठी माणसाला कसा परवडणार?
वरळीतील बीडीडी चाळीच्या इमारती 22 मजल्यांवरुन 40 मजल्यांच्या कशा झाल्या? हा निर्णय घेताना लोकांना विश्वासात घेण्यात आले नाही. सर्वसामान्य रहिवाशांना या इमारतींच्या मेंटेनन्स परवडेल का ? मराठी माणूस चाळीत राहतोय, त्याला कायमचा हद्दपार करण्याचे षडयंत्र आहे. या गोष्टींसाठी आपण यांना निवडून देणार आहात का ?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
राज ठाकरेंचं वरळीत सर्वात आक्रमक भाषण, पुतण्या आदित्य ठाकरेंवर काय बोलले?