अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, आता पाडणारच : अजित पवार
Maharashtra Politics: शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha Constituency) खासदार अमोल कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे.
Ajit Pawar on Amol Kolhe : एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट दंडही थोपटले आहेत. तसेच, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha Constituency) खासदार अमोल कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं. तसंच आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडून आणणारच, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
ज्यांनी माझी बाजू घेतली, त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये : अजित पवार
"ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे, त्यांनी माझ्यासोबतच यावं, ज्यांना दुसऱ्या बाजुला जायचं आहे, त्यांनी तिकडे जावं, माझ्या बाजूनं म्हणजे काय हुकुमशाही आहे का? ज्यांनी माझी बाजू घेतली, त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नका, मेहरबानी करा, खरं जे बोलतो तेच सांगा.", असं अजित पवार म्हणाले. अनेक कार्यकर्ते अजुनही दोन्ही बाजूंनी दिसतात, असं विचारताच अजित पवार म्हणाले की, "असू द्यात ना, मी सांगायचं काम केलं आहे, बघु काय फरक दिसतोय का? माझ्या दृष्टीनं जे योग्य वाटतं, ती भूमिका घेण्याची मला मुभा आहे, मला इतरांनी टोकण्याचं कारण नाही."
खासदाराला निवडणून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं : अजित पवार
"एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं, तर खूप बरं झालं असतं. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा, समोरा समोर. आता त्यांचं चाललंय सगळं. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या.", असं अजित पवार म्हणाले.
अमोल कोल्हेंविरोधातील उमेदवार निवडून आणणारच : अजित पवार
"उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती. ते वक्ते उत्तम आहेत, वत्कृत्त्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं. पण काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, मी आज तुला सांगतो की, निवडून आणून दाखवेल.", असं अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :