'आर.आर.आबा सत्यवादी माणूस, त्यांनी केसानं गळा कापणे म्हणणे चूकच,' सिंचन घोटाळा उघडकीस आणलेल्या विजय पांढरेंचा दादांवर वार
अजित पवार यांनी आज सांगली मधील सभेत सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणी आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला असं वक्तव्य केलं.

Vijay Pandhare on Ajit Pawar Irrigation Scam : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज तासगात माजी खासदार संजयकाका पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी दादांनी दिवंगत आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सही केल्याचा गौप्यस्फोट केला. यावेळी अजित पवार यांनी सांगली मधील सभेत सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणी आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला असं वक्तव्य केलं. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान यावर तात्कालीन सिंचन विभागाचे अधिकारी व सिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे यांनी दादांवर पलटवार केला आहे.
विजय पांढरे यांनी म्हटलं आहे की, आर आर आबा हे सच्चे व सत्यवादी माणूस होते. मी अनेकदा सिंचन सचिवांकडे सिंचन घोटाळ्याच्या तक्रारी केल्या, मात्र त्यांनी मला हा केबिनेट मंत्र्यांशी संबंधित विषय असल्याने यात लक्ष घालू नका व पुन्हा याविषयी तक्रारी करू नका. त्यानंतर मी थेट राज्यपालांची भेट घेऊन सिंचन घोटाळ्याची तक्रार केली. त्यांनी सिंचन व गृह विभागाकडे या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावेळी आबा गृहमंत्री असताना सचिवाने एखाद्या घोटाळ्याची फाईल सही साठी नेली असेल व सचिवांनी सुचविलेल्या चौकशीवर आर.आर. आबांनी सही केली असेल, त्यात त्यांचं काय चुकलं.
विजय पांढरे पुढे म्हणाले, त्यामुळे आबांनी केसाने गळा कापला म्हणणे चूकच आहे. अजित पवारांना मी जवळून बघितल आहे. अगदी पुराव्यानिशी सांगतो. चितळे समितीने दिलेल्या अहवालावर सरकार कारवाई करत नाही. एसीबीने अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. मात्र 72 तासांच्या सरकारच्या काळात त्यांना क्लीन चिट देण्याचं पाप एसीबीने केलं आहे. यावर नागपूर उच्च न्यायालय 2014 साली एक याचिका दाखल आहे. मात्र न्यायालय काही निकाल देत नाही. आता तर सहा वर्षांपासून सुनावणी ही बंद झालीय. चितळे समितीच्या अहवालावर जर कारवाई झाली तर संबंधित दोन तासात तुरुंगात जातील अस चितळे यांनी म्हटलं होत. मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करताच दुसऱ्या दिवशी अजित पवार भाजपा त जातात हे कशाच लक्षण आहे. त्यामुळे अजित पवारांनी आर आर आबा ना अस नाव ठेवणं चुकीचं आहे. जनता सगळं जाणून आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
