एक्स्प्लोर

Ajit Pawar: तुटायला वेळ लागत नाही, अजित पवार भावूक; अर्ज भरल्यानंतर बारामतीकरांना भावनिक साद

Ajit Pawar: लोकसभेला माझं चुकलं, सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हतं द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या लोकांनी सुप्रियाला मतदान केलं.

Ajit Pawar: पुणे : राज्याचं लक्ष लागेल्लया बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असाच सामना होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार त्यांच्याविरुद्ध बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, बारामतीमधील निवडणुकीत चांगलीच चूरस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये (Baramati) पवार कुटुंबातच लढत झाली होती. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत महाराष्ट्राने पाहिली, त्यामध्ये सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार, काका-पुतण्याच्या लढाईत काका जिंकणार की पुतण्या, अशी चर्चा मतदारसंघात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी (Ajit pawar) आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बारामतीकरांना उद्देशून भाषण केलं. यावेळी, अजित पवारांनी त्यांच्यास्टाईलने फटकेबाजी केली, तसेच ते भावूक झाल्याचंही दिसून आलं. 

लोकसभेला माझं चुकलं, सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हतं द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या लोकांनी सुप्रियाला मतदान केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला.. दादा म्हणजे हा दादा नाहीतर लोकांना वाटेल तो दादा. शिरुरला उभा राहा म्हणून सांगितले, बारामतीच्या लोकांनी त्यादिवशी जास्त आग्रह केला म्हणून आज मी उमेदवारी अर्ज भरल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. प्रत्येकाने आपापल्या गावात जा, दुसऱ्याच्या गावात जाऊ नका. आपापले घर सांभाळा  मी तुम्हाला हे का सांगतोय कारण माझंच घर नीट नाही. म्हणून मला भीती वाटते बोलताना, तुम्ही तिकडे गेल्यावर मला त्रास होतोय, अशी भावनिक सादही बारामतीकरांना अजित पवारांनी घातली.  

अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच एक कार्यकर्ता उठला आणि विचारले दादा खासदाराला निधी किती असतो. त्यावर अजित पवारांनी बारीक आवाज काढून पाच कोटी सांगितले. बघा दादा किती बदलला आहे? आधीचा दादा असता तर आवाज वाढवून बोलला असता, असे म्हणत अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच, एक कार्यकर्ता म्हणाला दादा याला (लहान मुलाला) तुम्हाला भेटायचं आहे. त्यावर अजित पवार म्हणाले आता काय मिठी मारू का? मात्र अजित पवारांच्या लक्षात येताच बेटा बस असे धीरगंभीर आवाजात अजित पवार म्हणाल्याचेही पाहायला मिळालं.

अजित पवार भावूक

मागे मी चूक केली, आता चूक कुणी केली? आई सांगते माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभा करू नका. तुटायला वेळ लागत नाही, असे म्हणत बारामतीमधील विधानसभेच्या निवडणुकीवरुन अजित पवार भावनिक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बारामतीची निवडणूक यंदा जेवढी चुरशीची आहे, तेवढीच भावनिकही होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.  

हेही वाचा

अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Embed widget