एक्स्प्लोर
"हिंमत असेल तर माढ्यातून लढाच", अजित पवारांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान
"शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मात्र जर त्यांनी निवडणूक लढवली तर इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामारं जावं लागेल," असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात केलं होतं.
पिंपरी चिंचवड: "कोल्हापूरचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माढ्यातून लढाच. तुम्हाला चितपट केलं नाही तर नाव सांगणार नाही," असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलं. पिंपरी चिंचवडमधील भोसरीत झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.
"चंद्रकांत पाटील काहीही बरळू लागले आहेत. म्हणे यावेळी पवार साहेबांचा पराभव होणार आहे. हा बाबा स्वप्नात आहे की बावचळून गेलाय कोणाला माहिती. ना कधी खासदारकी लढले ना आमदारकी अन् तरी आम्हाला फुकटचे सल्ले द्यायला द्यायला निघाले आहेत. त्यांनी आपली पाटीलकी सांभाळा, ती व्यवस्थित कशी राहिल हे पाहावं. उगाच काहीही गरळ ओकू नये आणि त्यांच्यात असेल हिंमत तर त्यांनी माढ्यातून लढावं. नाही चितपट केलं तर नावाचं सांगणार नाही," असं आव्हान अजित पवार यांनी दिलं.
माढ्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, शरद पवारांची घोषणा
VIDEO | हिंमत असेल तर माढ्यातून लढाच : अजित पवारांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान
पवार पहिल्यांदाच पराभवाला सामोरं जातील : चंद्रकांत पाटील
"राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मात्र जर त्यांनी निवडणूक लढवली तर इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामारं जावं लागेल. त्यामुळे त्यांनी वयाचा आणि तब्येतीचा विचार करुन निवडणूक लढवू नये. माढा आणि बारामत या जागी युतीचेच उमेदवार जिंकतील," असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात केलं होतं.
शरद पवार यंदा माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. विजयसिंह मोहिते पाटलांचा आग्रह आणि देशातल्या मंडळींमुळे आपण माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली होती.
पत्नी राष्ट्रवादीत गेली तरीही प्रचार शिवसेनेचाच : चंद्रकांत पाटील
संबंधित बातम्या
...म्हणून शिवसेनेने भाजपशी युती केली: चंद्रकांत पाटील
काँग्रेस-राष्ट्रवादीने कितीही बोंबलू दे, मतदान भाजपलाच होणार : चंद्रकांत पाटील
माझी पत्नी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढली तरी मी युतीधर्म पाळणार : चंद्रकांत पाटील
यूपीएससी’च्या तयारीसाठी मराठा समाजातील 225 तरुणांना दिल्लीत पाठविणार : चंद्रकांत पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement