एक्स्प्लोर

पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा

उल्हासनगर विधानसभा 141 मतदारसंघातील परिसरामध्ये मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या एका कारमधून 17 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

ठाणे : एकीकडे दिवाळीच धूम पाहायला मिळत असून दुसरीकडे विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय फटाके फुटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून (Election) भरारी पथके तैनात असून पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. काही दिवसनापूर्वीच पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथे पोलिसांनी एक कार जप्त केली होती. त्यामध्ये, तब्बल 5 कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. त्यानंतर, पुणे शहरातच सोन्याच्या दागिन्यांची वाहतूक करणारा टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला होता. बुधवारी पालघरमध्ये 5 कोटींची रोकड आढळून आल्यानंतर आता उल्हासनगरमध्येही एका कारमध्ये मोठी रोकड पोलिसांनी (Police) जप्त केली आहे. 

उल्हासनगर विधानसभा 141 मतदारसंघातील परिसरामध्ये मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या एका कारमधून 17 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक भरारी पथकांनी ही रक्कम जप्त केली असून रात्री दोनच्या सुमारास कल्याणकडून  मुरबाडकडे जाणारी कार संशयास्पद आढळून आल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम आढळून आली. त्यानंतर , भरारी पथकाने रोकड जप्त केली असून ही रक्कम पोलिसांनी कोषागार विभागात जमा केली आहे. याबाबत तत्काळ आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. 

15 दिवसांत 187 कोटींची रक्कम जप्त

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे 75 कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे 60 कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 11 कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे. दरम्यान, मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार  करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.

हेही वाचा

शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 90 at 9AM Superfast 06 December 2024 ९ सेकंदात बातमीABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 06 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सCM N DCM at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमी येथे बाळासाहेबांना अभिवादनABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 06 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून तुम्ही स्वतःला शिट्ट्या वाजवण्यापासून रोखू शकणार नाही
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून क्रेझी झाली ऑडियन्स
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
Embed widget