Top 90 at 9AM Superfast 06 December 2024 ९ सेकंदात बातमी
Top 90 at 9AM Superfast 06 December 2024 ९ सेकंदात बातमी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाणदिन. दादरच्या चैत्यभूमीवर उसळला भीमसागर
दादरच्या चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून अभिवादन, नव्या सरकारच्या शपथविधीनंतरचा हा पहिलाच मोठा सरकारी कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, संसद भवन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच हस्तांदोलन, संसद भवन परिसरात बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर दोघांनी साधला संवाद.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, संसद भवन परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन.
महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात रांगा, अनेक छोट्या मोठ्या शहरांमधून भीम अनुयाई मुंबईत दाखल.
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांनी चैत्यभूमी येथे सुरक्षेचा आढावा घेतला, यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीही उपस्थित.