'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून तुम्ही स्वतःला शिट्ट्या वाजवण्यापासून रोखू शकणार नाही
Pushpa 2 : The Rule: पुष्पा 2 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्यातील प्रत्येक दृश्यानं चाहत्यांना वेड लावलं आहे. पण ॲक्शन थ्रिलरच्या एका सीननं सगळी लाईमलाईट चोरली आहे.
Pushpa 2: 'पुष्पा 2: द रुल'नं (Pushpa 2 : The Rule) बॉक्स ऑफिसवर (Box Office) पुरता धुरळा उडवून दिला आहे. तसं पाहिलं तर, या चित्रपटाची क्रेझ रिलीज होण्यापू्र्वीपासूनच पाहायला मिळाली. अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी तिकीटांची जोरदार विक्री झाली. यावरुन तुम्हाला अंदाज लावता येईल की, चित्रपट रिलीज झाल्यानंतर काय झालं असेल... आपल्या लाडक्या सुपरस्टारच्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाचा सीक्वेल मोठ्या पडद्यावर रिलीज करण्यात आला आणि चाहत्यांनी एकच गर्दी केली. पुष्पा 2 चा प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग प्रेक्षकांना टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला भाग पाडतोय. पण, या चित्रपटात असा एक सीन आहे, जो पाहून चित्रपट पाहिल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. असं म्हटलं जातंय की, पुष्पा 2 मधला हा एकच सीन तब्बल 2000 कोटींचा गल्ला जमवण्यासाठी मदत करू शकतो.
'या' सीनमुळे 'पुष्पा 2: द रुल' 2000 कोटींचा गल्ला करू शकतो
'पुष्पा 2: द रुल' म्हणजे, मनोरंजनाची मेजवानी... चित्रपटातील एक-एक सीन, एक-एक डायलॉग प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पण, चित्रपटात असलेला एक सीन संपूर्ण चित्रपटाचा प्राण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या सीनमध्ये अल्लू अर्जुन डॅशिंग स्टाईलमध्ये साडी नेसलेला दिसत आहे. त्याची स्टाईल, त्याचा स्वॅग, सगळंच लय भारीत दिसतंय. हा सीन सुरू होताच, सर्वात आधी अंगावर शहारे येतात आणि त्यानंतर थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. या सीनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युजरनं लिहिलंय की, "माझे शब्द लक्षता ठेवा, 'पुष्पा 2: द रुल'चा हा सीन अगदी 2000 कोटींवर नेणार. नॉर्थकडच्या सर्व थिएटर्समध्ये सर्व चाहते क्रेझी झाले आहेत. अल्लू अर्जुन सध्या पीकवर आहे."
Mark my words 🔥🔥
— Bigg Boss 18 Booster (@bollywcentral) December 5, 2024
This scene in #Pushpa2 is going take this movie to 2000 crore.
The fans in my theatre in North went crazy 💥💥
Allu Arjun Peaks here 👌👌🔥🔥#pushpa2TheRule #Pushpa #Pushpa2TheRuleReview #RashmikaMandanna #AlluArjun #Pushpa2Reviewpic.twitter.com/eANyQbafRE
ओपनिंग डेच्या दिवशीच 'पुष्पा 2' ची धमाल
'पुष्पा 2' नं अॅडव्हान्स बुकिंगमध्येच बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला होता. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटानं ब्लॉक सीट्सशिवाय प्री-तिकीट सेलमध्ये सुमारे 91.24 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ब्लॉक सीटसह 105.67 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी चित्रपटावर नोटांचा पाऊस पडत आहे. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत चित्रपटानं 58.47 कोटी रुपये कमावले होते. संपूर्ण दिवसाची आकडेवारी अद्याप आलेली नाही. यासह 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे, यात काहीच शंका नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :