एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Government Formation | युतीबद्दल संध्याकाळी 4.30 नंतर भूमिका जाहीर करु : सुधीर मुनगंटीवार
राज्यात सत्ता समीकरणासाठी शिवसेना शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा, बातचीत, बैठकीच्या फैऱ्या सुरु आहेत. त्यातच भाजपच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत.
मुंबई : युतीबद्दल संध्याकाळी साडेसात नंतर भूमिका स्पष्ट करु, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर, संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेनेचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं दिसत आहे. सध्या वर्षा बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु आहे. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित आहेत.
भाजप सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठवलं आहे. शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज संध्याकाळी 7.30 पर्यंतची वेळ आहे. त्यामुळे संध्याकाळी साडेसातपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करणार का? हे पाहूनच भाजप आपला निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे निकलानंतर सलग सतरा दिवस भाजप 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत होतं. मात्र शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याचा 'प्लॅन ए' फसल्यानंतर भाजप आता 'प्लॅन बी' च्या तयारीला लागली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची चर्चा
राज्यात सत्ता समीकरणासाठी शिवसेना शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा, बातचीत, बैठकीच्या फैऱ्या सुरु आहेत. त्यातच भाजपच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवली तरी शिवसेनेचा पर्याय संपुष्टात आला, हे मान्य करायला भाजप तयार नाही. शिवाय काँग्रेस पाठिंबा देईल, याबाबत अजूनही साशंकता आहे. त्यामुळे बॉल पुन्हा भाजपच्या कोर्टात जाऊ शकतो. जर शिवसेना सत्ता स्थापन करण्यास अयशस्वी ठरली तर भाजप काय करणार याकडे आता लक्ष लागलं आहे.
अरविंद सावंत यांचा राजीनामा, शिवसेना एनडीएतून बाहेर
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत आज राजीनामा देणार आहेत. अरविंद सावंत यांनी खुद्द ट्वीट करुन याची माहिती दिली.त्यामुळे शिवसेना आज एनडीएतून बाहेर पडणार असल्याचं निश्चित झालं आहे. "खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे," असं सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
18 फेब्रुवारी 2019 रोजी युतीची घोषणा
2014 ची विधानसभा निवडणुकीच्या भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली. निवडणूक वेगवेगळी लढवल्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी दोन्ही पक्ष एकत्र आले. परंतु शिवसेना कायम विरोधकांच्या भूमिकेत दिसली. यानंतर 2019 च्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेसाठी 18 फेब्रुवारी रोजी युतीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढवणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी निम्म्या-निम्म्या जागा लढवल्या होत्या.
संबंधित बातम्या
शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार, अरविंद सावंत राजीनामा देणार
शिवसेना-भाजप युतीची घोषणा; मात्र जागावाटप अजूनही गुलदस्त्यात, कारण...
Maharashtra Government Formation | ...असा असेल भाजपचा "गेम ऑफ पेशन्स!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement