UGC: चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांची गरज नेमकी का आहे? वाचा काय म्हणतात डॉ.अनिल सहस्रबुद्धे
चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांची गरज नेमकी का आहे? चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप मिळणं शक्य आहे का? या प्रश्नाची उत्तरे अनिल सहस्रबुद्धे यांनी सविस्तर दिली आहेत.
मुंबई: आता चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप अनिवार्य असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नव्या रिसर्च इंटर्नशिप गाईडलाईन्सला मागील वर्षी मंजुरी मिळाली होती. यानंतर चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पुढच्या वर्षी सुरु करण्यासंदर्भात तयारी कुठपर्यंत झाली आहे? चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांची गरज नेमकी का आहे? चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप (Internship) मिळणं शक्य आहे का? असे काही प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. याच प्रश्नाची उत्तरे राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच आणि राष्ट्रीय मूल्यमापन मंडळचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्रबुद्धे (Dr Anil Sahasrabudhe) यांनी सविस्तर दिली आहेत.
याचबद्दल बोलताना डॉ. अनिल सहस्रबुद्धे (Dr Anil Sahasrabudhe) म्हणाले की, ''तीन वर्षाची पदवी मिळाल्यानंतरसुद्धा विद्यार्थ्यांना जॉब मिळत नाहीत. त्यामुळे एक वर्ष आणखी या पदवीमध्ये असेल तर इंटर्नशिप ट्रेनिंग किंवा मग प्रॅक्टिकल अभ्यासक्रम शिकता येईल, त्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम तयार आहे. चार वर्षाचा जर अभ्यासक्रम हा पूर्ण केला तर विद्यार्थी एम्प्लॉयबल होऊ शकतो.''
चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप मिळणं शक्य आहे का?
याबद्दल बोलताना डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, ''चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातसुद्धा सर्वांना इंटर्नशिप मिळू शकते. जरी ती सर्वांना मिळू शकली नाही, तरी काही टक्के विद्यार्थ्यांना तर इंटर्नशिप मिळू शकते. सर्व राज्यांना आम्ही सूचना केल्या आहेत. यूजीसीनेसुद्धा सूचना केल्या आहेत. या चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करावा. मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळणं सहज शक्य आहे. कारण तिथे इंडस्ट्री आहे.'' ते म्हणाले की, आता दूर असलेल्या विद्यार्थ्यांना नेमकी इंटर्नशिप कशी मिळणार, त्यासाठी आम्ही एआयसीटीईने इंटर्नशिप पोर्टल तयार केला आहे. चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी विशेष इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही. तीन वर्षासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तेवढेच लागणार. शिक्षकांना सतत ट्रेनिंग यासंदर्भात सुरू आहे.''
मातृभाषेत अभियांत्रिकी आणि पदवीचे शिक्षण कसं मिळणार?
या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, ''मातृभाषा शिक्षण मिळावे यासाठी मी एआयसीटीईचा अध्यक्ष असतानाच तयारी सुरू केली होती. आम्ही बारा भारतीय भाषांमध्ये पुस्तकांचा अनुवाद केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाची पुस्तके आम्ही तयार केली आहेत, ती प्रिंटेड फॉर्ममध्ये विकत घेण्याची गरज नाही. आम्ही वेबसाईटवर अपलोड केली आहेत. आम्ही सक्ती केली नाही की, मातृभाषा शिक्षण घ्या. मात्र जिथे विद्यार्थ्यांना मातृभाषा शिकायचं आहे तिथे ते शिकू शकतील.''
देशात डिजिटल युनिव्हर्सिटी सुरुवात होण्याचं काम कुठपर्यंत आलंय?
याबद्दल माहिती देताना डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, मागच्या बजेटमध्ये डिजिटल युनिव्हर्सिटीबदल मांडण्यात आलं होतं. ते एक हब आणि स्पोक मॉडेल असेल. सेंट्रल युनिट असेल त्याच्या सोबत संलग्न विश्वविद्यालय आणि कॉलेज आणि स्टार्ट कंपनीत असतील. त्यांचे कोर्स विद्यार्थ्यांना घेता येतील आणि हे कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याला डिग्री डिजिटल युनिव्हर्सिटी कडून मिळेल. ते म्हणाले, महाराष्ट्रात युनिव्हर्सिटी कधी सुरू माहित नाही. मात्र राष्ट्रीय पातळीवर एक डिजिटल विद्यापीठाचे काम सुरू आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI