UPSC Prelims 2021 Preparation Tips: परीक्षेला फक्त एक आठवडा शिल्लक, परीक्षा क्रॅक करण्याच्या टिप्स जाणून घ्या
UPSC Prelims 2021, 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. परीक्षेला बसणारे उमेदवार तयारीच्या शेवटच्या दिवसात या टिप्स पाळू शकतात.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 10 ऑक्टोबर 2021 रोजी ऑफलाइन मोडमध्ये UPSC प्रीलिम्स 2021 आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. शस्वीरित्या परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना प्रभावी उजळणी नियोजन करणे आवश्यक आहे. शेवटी, नागरी सेवा परीक्षेचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने देशातील धोरणनिर्मिती आणि नियमन प्रक्रियेचा एक भाग होण्याचे स्वप्न पाहिले आहे. परीक्षेची तारीख, प्रवेशपत्र आणि इतर अधिक तपशील आता upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
कठोर परिश्रम आणि धोरणात्मक नियोजन हे फॅक्टर परीक्षेच्या उमेदवाराच्या तयारीचा कणा आहे. जर या तयारीमध्ये काही स्मार्ट तंत्रांचा समावेश केल्यास आयएएस परीक्षांना क्रॅक करणे सोपे केले जाऊ शकते. अशाच काही टिप्स येथे जाणून घेऊया.
तयारीचा फोकस लर्निंगवरुन उजळणीवर बदला
आपण पूर्वी अभ्यास केलेल्या सर्व गोष्टींची पुन्हा तपासणी करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे उजळणी. प्रीलिम्समध्ये फक्त काही दिवस शिल्लक असताना, एखाद्याने तयारीचा फोकस शिकण्यापासून उजळणीकडे वळवला पाहिजे. सशक्त तयारीच्या पायावर, अभ्यास साहित्याची उजळणी केल्यास विद्यार्थ्यांना त्यांनी शिकलेले ज्ञान एकत्रित करण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त, उजळणीमुळे उमेदवाराचा प्रश्नांची उत्तरे देण्याचा आत्मविश्वास वाढेल.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; 27 जूनला होणारी परीक्षा आता 10 ऑक्टोबरला
मागील वर्षांच्या UPSC प्रश्नपत्रिका सोडवा
मागील वर्षांच्या यूपीएससीच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हे एक प्रभावी साधन आहे जे उमेदवारांना परीक्षेत त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास मदत करते. मागील वर्षांच्या परीक्षा प्रश्नपत्रिका सोडवल्याने विद्यार्थ्यांना त्यांची तयारी कुठे कमी आहे हे जाणून घेण्यास मदत होऊ शकते. यामुळे आपल्या जमेच्या बाजू आणि कमकुवतपणा याचे विश्लेषण करण्यास मदत होते. शिवाय, जेव्हा उमेदवारांना सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायला किती वेळ लागतो याची कल्पना येते, तेव्हा पेपरच्या प्रकारावर आणि पॅटर्नवर त्यांची पकड मजबूत करताना वेळ मर्यादा दबाव कमी करण्यास मदत होते.
अधिक मॉक टेस्ट घ्या
परीक्षेची तयारी करताना कमकुवत बाजू ओळखण्यासाठी अनेक मॉक टेस्ट करणे देणे महत्वाचे आहे. मॉक टेस्टचा वारंवार सोडवल्याने एखाद्याचा परीक्षेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मदत मिळू शकते. कारण, यामुळे परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता वाढतेच. शिवाय उमेदवारांना शिकण्याच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यास मदत होते. आयएएसच्या तयारीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्वयं मूल्यांकन.
योजना आखा आणि त्यावर ठाम रहा
तपशीलवार वेळापत्रक असणे उमेदवारांच्या परीक्षेची तयारी सुलभ करण्यास आणि अभ्यासाला अधिक सुव्यवस्थित करण्यास तसेच नागरी सेवा परीक्षेच्या आसपासचा ताण आणि चिंता दूर करण्यास मदत करू शकते.
सकारात्मक राहा, निरोगी खा, पूर्ण झोप घ्या
परीक्षा प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी सकारात्मक राहणे अनिवार्य आहे. व्यायाम आणि विविध छंदांमध्ये गुंतून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे परीक्षार्थी उमेदवारांना त्यांच्या यूपीएससी तयारीदरम्यान निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे आहे. यादरम्यान, चांगले झोपा आणि निरोगी खा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI