Mumbai University Examination: मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाच्या 29 जूनच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या, प्रवेशाची दुसरी यादी 28 जून रोजी
Mumbai University Examination: मुंबई विद्यापीठाने 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षांची सुधारीत तारीख जाहीर केली आहे. प्रवेशाची दुसरी यादी 29 जून ऐवजी 28 रोजी जाहीर होणार आहे.
Mumbai University Examination: बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणाची सुट्टी दिनांक 28 जून 2023 रोजी दर्शविण्यात आली होती तथापि बकरी ईद हा सण गुरुवार दिनांक 29 जून 2023 रोजी येत असल्याने या दिवशीच्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेच्या एकूण 25 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियाची दुसरी यादी यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दिनांक 29 जून 2023 रोजी जाहीर केली जाणार होती. परंतु या दिवशी सुट्टी जाहीर झाल्याने प्रवेशाची दुसरी यादी दिनांक 28 जून 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्यावतीने देण्यात आली आहे.
29 जून रोजी मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या एकूण 25 परीक्षा होत्या. त्यातील अभियांत्रिकी विद्याशाखेतील प्रथम वर्ष सत्र दोनच्या सर्व शाखेच्या ( चॉईस बेस व सी स्कीम ) या परीक्षा 30 जून 2023 रोजी ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच बीएससी ( हॉस्पिटॅलिटी स्टडीज ) सीबीएसजीएस व चॉईस बेस सत्र 5, टीवाय बीएससी (फॉरेन्सिक सायन्स) सत्र 6, एमएससी व एमएससी ( बाय रिसर्च ) चॉईस बेस सत्र 4,
बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स) चॉईस बेस सत्र 6, बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट ) सत्र 6, बीकॉम ( फिनान्शियल मॅनेजमेंट ) सत्र 6, टिवाय बीकॉम (आयडॉल ) सत्र 6, बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट ) सत्र 6, बीएमएस सत्र 5, एमए सीबीएसजीएस सत्र 2 व 4, बीएड सत्र 4, व एमएड सत्र 4 अशा सकाळच्या सत्रातील 17 परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या असून यांची सुधारित तारीख 8 जुलै 2023 ही आहे असे, मुंबई विद्यापीठाने कळवले आहे.
तसेच दुपारच्या सत्रातील टीवाय बीएससी (फॉरेन्सिक सायन्स ) सत्र 5 , एमएमएस (आयडॉल ) सत्र 3, टीवाय बीए (आयडॉल ) सत्र 6, एमए (कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ) सत्र 3, एमए ( पब्लिक रिलेशनस) सत्र 3, एमए (टेलिव्हिजन स्टडीज ) सत्र 3, एमए (इलेक्ट्रॉनिक मीडिया ) सत्र 3 आणि एमए (फिल्म स्टडीज ) सत्र 3 अशा आठ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत या परीक्षांची सुधारित तारीख 8 जुलै 2023 रोजी ठेवण्यात आली आहे.
प्रवेशाची दुसरी यादी 28 जून रोजी जाहीर होणार
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दिनांक 29 जून 2023 रोजी जाहीर होणार होती, परंतु बकरी ईदची सुट्टी 29 जून रोजी जाहीर झाल्याने, प्रवेशाची दुसरी यादी 28 जून 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर होईल.
28 जून रोजी कार्यालय सुरू आणि 29 रोजी सुट्टी
यापूर्वीच्या शासकीय सुट्टीनुसार बकरी ईदची सुट्टी ही 28 जून 2023 रोजी होती. परंतु ती सुट्टी 29 जून 2023 रोजी असल्याने मुंबई विद्यापीठाचे सर्व कार्यालये बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी सुरू असतील तर दिनांक 29 जून 2023 रोजी मुंबई विद्यापीठाचे सर्व कार्यालये हे बंद असतील याची विद्यार्थी व महाविद्यालये यांनी नोंद घ्यावी असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI