Mumbai University Examination: मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाच्या 'टीवाय'सह इतर परीक्षेच्या तारखा जाहीर
Mumbai University Examination Date : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. सेमेस्टर 5 आणि 6 च्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत.

Mumbai University Examination Date : मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्र 2023 च्या (Mumbai University Examination 2023) विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांच्या तारखांना नुकत्याच झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विद्यापीठ उन्हाळी सत्राच्या 431 परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उन्हाळी सत्राच्या या परीक्षा27 मार्च 2023 पासून सुरु होत आहेत.
2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष कॉमर्स सेमेस्टर 6 ची परीक्षा 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर, तृतीय वर्ष बीए व बीएस्सी सेमेस्टर 5 च्या परीक्षा 12 एप्रिल व बीएमएस सेमेस्टर सहाच्या परीक्षा 25 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्यावतीने देण्यात आली आहे.
431 परीक्षांच्या तारखा जाहीर
मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा जास्त परीक्षा घेण्यात येते. विद्यापीठाने 2023 च्या उन्हाळी सत्राच्या आर्ट्स शाखेच्या एकूण 85 परीक्षा, वाणिज्य शाखेच्या 97 परीक्षा, विज्ञान विद्याशाखेच्या 116 परीक्षा तर आंतर विद्याशाखेच्या 133 अशा 431 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. सर्व विद्याशाखेच्या सर्व परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली आहे.
परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे व त्यांच्या विभागाने या परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार केले आहे, हे वेळापत्रक तयार करताना संबंधित विद्याशाखांचे 90 दिवसांचे सत्र, सुट्ट्या व इतर विविध व्यावसायिक परीक्षा याचाही विचार करून या तारखांचे वेळापत्रक तयार केले असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बारावीच्या परीक्षा घेणार, पण संप काळात उत्तरपत्रिका...
बारावीच्या परीक्षा (HSC Exam) घेणार पण संप काळात बारावी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका (12th Board Exam Answer Sheet) तपासणार नाही, अशी भूमिका राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने (State Junior College Teachers Association) घेतली आहे. दरम्यान, जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर संकटाचे काळे ढग जमा झाले आहेत. या संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
