एक्स्प्लोर

राष्ट्रीय स्तरावर शिक्षणविषयक चर्चा घडवण्यासाठी 'वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषदे'चं आयोजन

Summit India Announces Virtual Education Summit : राष्ट्रीय स्तरावर शिक्षणविषयक सर्वांगीण चर्चा घडवून आणण्यासाठी ‘वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषदे’चे आयोजन करण्यात आलं आहे.

Summit India Announces Virtual Education Summit : कोरोनासारख्या महाभयंकर साथीनंतर देशातील बदलत्या शिक्षण व्यवस्थेवर सर्वांगीण चर्चा घडवून आणण्यासाठी तब्बल तीन महिने चालणाऱ्या 'वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषद 2022'चे आयोजन करण्यात आलं आहे. 'समिट इंडिया'ने 'टेक अवंत- गर्दे'च्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या शिखर परिषदेची सुरुवात 20 ते 22 जानेवारी दरम्यान तीन दिवसीय आभासी (व्हर्च्युअल) परिषदेनं होणार असून परिषदेची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उद्घाटनपर संदेशानं होणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि 'संकरित शिकणं' (हायब्रिड लर्निंग) यांच्याशी संबंधित बारकाव्यांवर विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते चर्चा करणार आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, कौशल्य विकास, उद्योजकता, इलेक्ट्रानिक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, आदिवासी व्यवहार खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मसुदा समितीचे सदस्य एम. के. श्रीधर, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक प्रा. श्रीधर श्रीवास्तव, सीबीएसईचे कौशल्य आणि प्रशिक्षण संचालक डॉ. विश्वजीत सहा, असोसिएशन ऑफ स्कूल्स फॉर इंडियन स्कूल्स सर्टिफिकेटचे (एसआयसी) राष्ट्रीय सचिव के. व्ही. व्हिन्सेंट, शिक्षा संस्कृती उत्थानचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी, मायक्रोसॉफ्ट इंडियाचे एज्युकेशन अॅड्वोकसीचे संचालक डॉ. विनी जोहरी या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत.

शिक्षण शिखर परिषदेविषयी माहिती देताना 'समिट इंडिया'चे अध्यक्ष श्याम जाजू म्हणाले, "राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चे ध्येय-दृष्टी पुढे नेण्यासाठी, त्यावर सर्वांगीण चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही 'वसुधैव कुटुंबकम-आभासी (व्हर्च्युअल) शिक्षण शिखर परिषद 2022’चे आयोजन केलं आहे. भारतासाठीच्या नव्या शिक्षण पद्धतीचा आराखडा मांडणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळं आपल्या शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण सुधारणा होणार असून आपले शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जासमान होईल, ज्याचा आपल्या भावी पिढ्यांवर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल."

तीन दिवसीय परिषदेनंतर 29 जानेवारी ते 9 एप्रिल 2022 दरम्यान साप्ताहिक पॅनल चर्चा होणार आहेत. करोना महासाथीनंतरच्या, डिजिटली रुपांतरित झालेल्या शिक्षण व्यवस्थेसमोरील विविध आव्हानं आणि संधी यांबाबत इथे सखोल चर्चा होईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी 202), डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि होलिस्टिक लर्निंग (डीटीएचएल), तसंच संकरित शिक्षण (हायब्रिड लर्निंग) यांद्वारे भारतीय शिक्षण व्यवस्थेची अशी एक मजबूत चौकट तयार होईल, जी 'डिजिटल-नेटिव्ह' विद्यार्थ्यांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यास सक्षम असेल. 

हायब्रिड लर्निंग आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेविषयी माहिती देताना 'टेक अवंत- गर्दे'चे सीईओ अली सैत म्हणाले, "शिकण्यासाठी तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा किती वापर होऊ शकतो, याचा अंदाज सर्वचजण घेऊ लागलेत. आजच्या जगात ज्ञान हीच सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. त्यामुळे माहिती-श्रीमंत, विकसित तंत्रज्ञान-सक्षम आणि सहयोगी शिक्षण वातावरणाचे फायदे विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि एकंदरच संपूर्ण समाजापर्यंत कोणत्याही प्रकारचं बंधन नसलेल्या शिक्षणाद्वारे पोहोचायलाच हवेत. 'वसुधैव कुटुंबकम शिक्षण परिषद' हा असा एक उपक्रम आहे, ज्याद्वारे हायब्रिड लर्निंग तसंच राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबतची जागरुकता वाढेल, आणि साहजिकच त्याद्वारे आपली शिक्षण व्यस्था, आपला समाज भविष्यातील आव्हानं पेलण्यास सज्ज होईल. 

वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषद सर्वांसाठी खुली असून त्याविषयीच्या अधिक माहितीसाठी https://vasudhaivakutumbakam.live/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

CET साठी 25 लाखांचा रेट, ॲडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 
CET साठी 25 लाखांचा रेट, ॲडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
NCP meeting Sunetra Pawar: निधी मिळाला नाही तर जेवढ्या मतांनी निवडून आलोय, तेवढ्याच मतांनी पडेन! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने सुनेत्रा पवारांना स्पष्टच सांगितलं
निधी मिळाला नाही तर जेवढ्या मतांनी निवडून आलोय, तेवढ्याच मतांनी पडेन! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने सुनेत्रा पवारांना स्पष्टच सांगितलं
Embed widget