एक्स्प्लोर

तंत्रज्ञान व पूर्वनियोजनाचे यश : नाशिक मुक्त विद्यापीठाच्या सर्व परिक्षा यशस्वी!

अनेक शैक्षणिक संस्थाना परीक्षा घेताना अडचणी आल्या. मात्र, नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जवळजवळ दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा (1 लाख 90 हजार 339) दिनांक 5 ऑक्टोबरपासून कोणतीही अडचण न येता सुरळीत सुरु झाल्या.

मुंबई : कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण भारतामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक शैक्षणिक संस्थाना परीक्षा घेताना अडचणी आल्या. ठरलेल्या दिवशी परीक्षा अचानक रद्द तरी कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलाव्या लागल्या. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जवळजवळ दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा (1 लाख 90 हजार 339) दिनांक 5 ऑक्टोबरपासून कोणतीही अडचण न येता सुरळीत सुरु झाल्या. आता त्या 30 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहेत.

सर्व्हर फेल होणे, पेपर वेळेवर न मिळणे, मुलांची कमी उपस्थिती असणे असे चित्र अनेकदा पुढे आलेले असताना मुक्त विद्यापीठाने यावर काय उपाय केला? हे शोधले असता रोचक माहिती पुढे आली आहे. सद्यस्थितीत पारंपरिक परीक्षा घेणे कठीण होणार हे ओळखून विद्यापीठाने आधीच नियोजन करून प्रत्येक विषयाची प्रश्नसंच तयार केली. विविध शिक्षणक्रमांसाठी 3 ते 4 पट प्रश्न तयार करून योग्य फॉरमॅटमध्ये बसविले. विद्यापीठ दूरस्थ पद्धतीने अनेक गोष्टी करत असल्याने यावेळी संपूर्ण परीक्षा ऑनलाईन घ्यावयाचा निर्णय घेतला. त्यामुळे सोशल डीस्टन्सीगचा प्रश्न आला नाही.

एकाच वेळी सर्व विद्याथी लॉग-इन झाले तर सर्व्हरवरील लोड वाढून तो फेल होतो. म्हणून पेपरची वेळ सरळ 5 तासांची ठेवली. म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते 8 अशा वेळेत विद्यार्थ्यांनी कोणत्याही सलग एका तासात परीक्षा द्यावी असे स्वातंत्र्य दिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीची वेळ घेता आली व सर्व्हरवरील लोडही विभागला गेला. शिवाय प्रश्नसंच पद्धतीमुळे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना (समान भाराचे) मात्र वेगवेगळे प्रश्न गेल्याने पेपरफुटीचाही प्रश्न आला नाही. मुक्त विद्यापीठाने वेळापत्रक बनविताना एका स्लॉटमध्ये सारखी विद्यार्थीसंख्या राहील याचीही काळजी घेतली.

SPPU Final year exams | पुणे विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांसमोर तांत्रिक अडचणींची परीक्षा

विद्यापीठाकडील अॅमॅझोनचा ‘क्लाउड सर्व्हर’ स्केलेबल असल्याने लोड जास्त झाल्यास तो नवीन सर्व्हरवर वितरीत होतो. विद्यार्थ्यांना अॅमॅझोन, गुगल, 3-सेव्हर्स आणि अॅझ्यूअर यापैकी कोणतीही व्यवस्था वापरण्याची मुभा आणि अँड्रोइड फोन, टॅबलेट, लपॅटॉप, कम्प्युटर, विंडो, अॅपल अशा सर्व सिस्टीमवर चालणारे ब्राउझर दिल्याने त्यांना अडचणी आल्या नाहीत. मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी महाराष्ट्रातील दुर्गम भागातही आहेत. घरात नेटवर्क मिळत नाही म्हणून काहीजण फोन घेऊन घराबाहेर गेले, कुणी गच्चीवर तर कुणी चक्क डोंगरावर जावूनही नेटवर्क मिळवले.

पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात 77% तर दुसऱ्या सत्रात 87% विद्यार्थी परीक्षेस बसले. आता या परीक्षा दिनांक 30 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहतील. पूर्वनियोजन आणि तंत्रज्ञानाचा आक्रमक वापर केल्यामुळे हे शक्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या परीक्षा 30 ऑक्टोबरपर्यंत सुरु आहेत.

डॉ. दिनेश भोंडे (विद्यापीठाचे कुलसचिव)

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात होत होतं. अशा परिस्थितीमध्ये परीक्षा कशा घ्यायच्या असा प्रश्‍न प्रशासनासमोर निर्माण झालेला होता. मुक्त विद्यापीठात शहरापासून खेड्यापर्यंत लाखो विद्यार्थी मुक्त विद्यापीठाद्वारे दूर शिक्षण घेत असतात. अशा विखुरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे हे एक आव्हान आमच्या समोर होतं. मात्र. आम्ही तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत आणि सुटसुटीत नियोजन करत या परीक्षा यशस्वीपणे घेण्यास सुरुवात केलेली आहे, आणि यामध्ये आम्हाला यशही प्राप्त झालेलं आहे.

डॉ. आंबेडकर विद्यापीठात परीक्षेचा गोंधळ सुरुच; 11वाजताच्या ऑफलाईन परीक्षेचे पेपर अद्याप मिळाले नाहीत

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Thane Mahanagarpalika Election 2026: ठाण्यात तुफान राडा, मिनाक्षी शिंदें-भोईरांचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज, डोळ्यात मिरची पावडर फेकल्याचा आरोप, प्रचंड तणाव
ठाण्यात तुफान राडा, मिनाक्षी शिंदें-भोईरांचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज, डोळ्यात मिरची पावडर फेकल्याचा आरोप, प्रचंड तणाव
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
Embed widget