SSC Constable Notification 2023 : दिल्ली पोलिसात बंपर भरती, 70 हजार पगार, 12वी पासही करू शकतात अर्ज; वाचा सविस्तर
SSC Constable Bharti 2023 : दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी एसएससी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
SSC Constable Notification 2023 : कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज सुरू केले आहेत. इच्छुक उमेदवार एसएससी अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.
इतक्या पदांसाठी भरती
मिळालेल्या माहितीनुसार, स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष आणि महिलांच्या 7547 पदे भरणार आहे. कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुषांसाठी 4453 पदे आहेत. तर, कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष (माजी सैनिक (इतर) (अनुशेष अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह) ची 266 पदे, कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष (माजी सैनिक कमांडो (पॅरा-3.1) च्या 337 पदे, (अनुशेष अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह) ) समाविष्ट आहेत. कॉन्स्टेबल (कार्यकारी) महिलांसाठी 2491 पदे आहेत.
पात्रता काय असावी?
उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेनंतर केली जाईल. या वर्षाच्या अखेरीस ही परीक्षा होणार आहे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10+2 (वरिष्ठ माध्यमिक) उत्तीर्ण असावा. त्याच वेळी, सेवारत, सेवानिवृत्त किंवा दिवंगत दिल्ली पोलिस कर्मचारी/दिल्ली पोलिसांचे मल्टी-टास्किंग कर्मचारी आणि बॅंड्समन, बगलर्स यांचे मुलगे/मुलींना 11वी पासपर्यंतच्या पात्रतेमध्ये सूट देण्यात आली आहे.
फी इतकी असेल
SSC कॉन्स्टेबल भरती 2023 साठी, उमेदवारांना 100 रुपये शुल्क जमा करावे लागेल. आरक्षणासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
'असा' करा अर्ज
- SSC कॉन्स्टेबल भरती 2023 साठी पहिली अधिकृत साईट ssc.nic.in वर जा.
- यानंतर, होमपेजवर, तुम्हाला दिल्ली पोलिस परीक्षा-2023 मधील कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) पुरुष आणि महिला यांच्या माहितीवर क्लिक करावे लागेल.
- लॉगिन तपशील भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
- अर्ज भरल्यानंतर फी भरा. यानंतर तुमचा फॉर्म भरला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI