एक्स्प्लोर

दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार? संदिग्ध प्रश्नावरुन कपिल पाटलांचं दीपक केसरकरांना पत्र, नेमकं प्रकरण काय?

SSC Board Exam Paper : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी इयत्तेच्या विज्ञान एक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि बोर्डाला पत्र लिहिलं आहे.

SSC Board Exam Paper : मुंबई : दहावी बोर्डाची परीक्षा (10th Board Exam) सुरू आहे. अशातच विज्ञान एकच्या (Science One Paper) पेपरमधील एका प्रश्नावरुन विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम दिसून आला आहे. अशातच आमदार कपिल पाटील (MLA Kapil Patil) यांनी यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर School Education Minister Deepak Kesarkar) आणि महाराष्ट्र बोर्डाला (Maharashtra Board) पत्र लिहिलं आहे. तसेच, या पत्रातून कपिल पाटील यांनी संदिग्ध प्रश्नाच्या उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याची मागणी केली आहे. 

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी इयत्तेच्या विज्ञान एक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि बोर्डाला पत्र लिहिलं आहे. आमदार कपिल पाटील यांची ही मागणी मान्य झाली तर दहावीच्या विद्यार्थ्यांना संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांसाठी अतिरिक्त गुण मिळू शकतील. 

आमदार कपिल पाटील यांनी पत्रात काय म्हटलंय? 

दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत विज्ञान एक या विषयाचा पेपर अठरा मार्च रोजी झाला होता. त्यात सर्वात लहान आकाराच्या अणूचं नाव लिहा, असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी याबाबत आपल्याकडे चिंता व्यक्त केल्याचं आमदार कपिल पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता या प्रश्नाचं अचूक उत्तर 'हायड्रोजन' हे आहे. पण काही शाळांमध्ये या प्रश्नाचं उत्तर 'हेलियम', तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर 'हायड्रोजन' असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधलं आहे. 

कपिल पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, "हायड्रोजनच्या अणुत्रिजेची गणना मूल्य 53 pm आहे तर हेलिअमच्या अणुत्रिजेचे गणना मूल्य 31 pm आहे; कारण जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते. हायड्रोजन हा द्वि-आण्वीय वायू आहे तर हेलिअम हा एक-अण्वीय वायू आहे. त्यामुळे, अणुत्रिज्यांच्या गणना केलेल्या मूल्यांची तुलना करणे योग्य नाही. दोन्ही अणूंची 'बॅन दे वॉल्झ' (Van der Waals) त्रिज्यांची तुलना करणे अधिक योग्य ठरेल. हायड्रोजन अणूची बॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 120 pm आहे तर हेलिअम अणूची वॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 140 pm आहे."

"या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल. पुढच्यावेळी सुधारित उत्तरासाठी उचित सुधारणा करता येतील. आता मुलांचे गुण कमी का करायचे ? वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकरिता एक गुणही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थी, पालक यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल. तरी कृपया इयत्ता दहावीच्या विज्ञान 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या उत्तराबाबत खुलासा करावा.", अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahendra Dalvi on Sunil Tatkare : भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत तटकरेंना कायम अंगावर घेईनMakrand Jadhav Buldhana : स्वागताला एकही आमदार आला नाही, पालकमंत्री म्हणाले,ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 27 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Embed widget