NEET UG 2023: उद्या होणार 'नीट' परीक्षा; परीक्षेला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
NEET UG 2023 Tomorrow: नीट यूजी परीक्षा उद्या, म्हणजेच 7 मे रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी जारी केलेली महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे, वेळ आणि परीक्षेसाठी कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागणार? जाणून घ्या...

NEET UG 2023 Important Instructions: नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रान्स टेस्ट (नीट), अंडर ग्रॅज्युएट (यूजी) ही परीक्षा रविवारी (7 मे), म्हणजेच उद्या घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षा आयोजित करण्याची तयारी पूर्ण केली आहे. ही परीक्षा उद्या देशभरातील विविध केंद्रांवर एकाच वेळी होणार आहे. देशभरातील 20 लाखांहून अधिक उमेदवार ही परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रांवर सकाळी 11 वाजल्यापासून नोंदणी सुरू होईल. शेवटच्या क्षणी परीक्षेसाठी कोणती तयारी करावी हे जाणून घ्या...
परीक्षेला जाताना ही कागदपत्रे तयार ठेवा
- प्रवेशपत्र सोबत असणे आवश्यक.
- प्रवेशपत्रावर पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photo) असावा.
- एक पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photo) सोबत ठेवा, जो हजेरी पत्रकावर (Attendance Sheet) चिकटवला जाईल.
- वैध मूळ ओळखपत्र (Valid ID) सोबत ठेवा.
- दिव्यांग प्रमाणपत्र, लागू असल्यास, सोबत असणे आवश्यक आहे.
वेळेची विशेष काळजी घ्या
- परीक्षेला जायला उशीर करू नका, पेपरच्या किमान 45 मिनिटे आधी केंद्रावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- परीक्षा दुपारी 2 ते 5.20 या वेळेत म्हणजेच एकूण 3 तास 20 मिनिटांपर्यंत चालेल.
- विद्यार्थी दुपारी 1.15 वाजल्यापासून त्यांच्या जागेवर बसू शकतात आणि दुपारी 1.30 नंतर कोणालाही हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
- दुपारी 1.30 ते 1.45 पर्यंत परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या घोषणा होतील आणि 1.45 वाजता प्रश्नपत्रिका दिली जाईल.
- दुपारी 1.50 ते 2 या वेळेत उमेदवारांना त्यांचे आवश्यक तपशील उत्तरपत्रिकेत भरावे लागतील.
- दुपारी ठीक 2 वाजता पेपर सुरू होईल आणि संध्याकाळी 5.20 पर्यंत चालेल.
या गोष्टी सोबत घेऊन जाऊ नका
- स्टेशनरी वस्तू जसे की पेन्सिल, पेन, बॉक्स, खोडरबर, कॅल्क्युलेटर, रायटिंग पॅड इत्यादी.
- तसेच मोबाईल, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्टवॉच, इअरफोन, हेल्थ बँड सोबत बाळगू नका.
- गॉगल, हँडबॅग, पाण्याच्या बाटल्या, कोणत्याही प्रकारच्या खाद्यपदार्थांनाही बंदी आहे.
ड्रेस कोडकडे लक्ष द्या
परीक्षेसाठी जारी केलेल्या विशेष ड्रेस कोडचे (Dress Code) पालन करा, अन्यथा तुम्हाला केंद्रात (Exam Centre) प्रवेश मिळणार नाही. पूर्ण बाह्यांचा शर्ट (Full Sleeves Shirt) किंवा इतर पूर्ण बाह्यांचा कोणताही ड्रेस घालू नका. खिशांचे कपडे घालून जाऊ नका. शूज (Shoes) घालू नका, फक्त सँडल (Sandal) किंवा चप्पल घालून जा. तुमचे प्रवेशपत्र आणि इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे आजच काढा.
हेही वाचा:
फडणवीस म्हणतात पुन्हा येईन, म्हणजेच एकनाथ शिंदेंसाठी चिंतेची बाब; जयंत पाटलांची खोचक टीका
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
