Mumbai University : मुंबई विद्यापीठाने वाढवली बहुविद्याशाखीय ओपन इलेक्टिव्हची व्याप्ती
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयामुळे चारही विद्याशाखेतील ज्ञानाचे भांडार खुले झाले आहे. कार्यांतर्गत प्रशिक्षणासाठी नाविन्यपूर्ण क्षेत्राची निवड करण्यात आली आहे.
मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठात विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे भांडार खुले करण्यात आले आहे. विद्यापीठाने बहुविद्याशाखीय ओपन इलेक्टिव्हची व्याप्ती वाढवली असून ही संख्या आता शंभराच्या पुढे गेली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत विविध विद्याशाखेतील ओपन इलेक्टिव्हसना मान्यता देण्यात आली. यामध्ये फ्रेंच लँग्वेज अँड कल्चर फॉर हॉस्पिटॅलिटी, एथिक्स अँड एटिकेट्स इन डिजिटल टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूस्, योगा फॉर हेल्थ अँड वेलनेस, एपिग्राफी, बेसिक एस्ट्रोनॉमी, केस स्टडीस इन मॅनेजमेंट, मार्केटिंग मिक्स – I, लीडरशिप मॅनेजमेंट, मार्केटिंग मिक्स – II, इंडस्ट्री 4.0, एथिक्स अँड एटीकेट्स इन डिजिटल टेकनॉलॉजी, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल करन्सी अँड ब्लॉक चेन टेक्नोलॉजी , सायबर सिक्युरिटी, आणि सिव्हिल इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर एसेंशिअल अशा दोन 2 क्रेडिटच्या ओपन इलेक्टिव्हसची बास्केट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याचबरोबर नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नोलॉजी विभागामार्फत विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणे याबाबत प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी नाविन्यपूर्ण कार्यांतर्गत प्रशिक्षण क्षेत्र निर्माण केली आहेत. ज्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन स्पेक्ट्रोस्कोपिक (यूव्ही-वीआयएस, आयआर अँड रामन), सर्टिफिकेट कोर्स इन आरटी -पीसीआर, मायक्रोस्कॉपिक टेकनिक्स (एसइएम, टीइएम, एएफएम अँड एसटीएम), क्रोमॅटोग्राफीक टेकनिक्स (जीसी अँड एचपीएलसी) अशा क्षेत्रांचा समावेश असल्याचा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
एमएमएस पदव्युत्तर अभ्यासक्रमांस लॅटरल एन्ट्रीने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभियांत्रिकी पदवीधारकांना एमएमएस या दोन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या थेट प्रवेशासाठी अभ्यास मंडळाने तयार केलेल्या ब्रिज कोर्सेसना विद्या परिषदेची मंजूरी मिळाली आहे. यामध्ये फंडामेंटल्स ऑफ मॅनेजमेंट थेअरी अँड प्रॅक्टीस, फायन्साशिअल अकाऊंटीग फॉर बिझनेस, फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, कॉर्पोरेट फायनान्स, ह्युमन रिसॉर्स मॅनेजमेंट आणि इन्फॉर्मेशन सिस्टम अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या विषयांचा समावेश आहे.
ही बातमी वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI