गौतम अदानींवर पैशांचा पाऊस! एकाच दिवसात कमावले 5.74 अब्ज डॉलर्स, अब्जाधिशांच्या यादीत टॉप 20 मध्ये समावेश
शेअर बाजारातील वाढीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी यांना झाला आहे. त्यांच्या संपत्तीत फक्त एका दिवसात 5.74 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
Gautam Adani Net Worth : सलग सहा आठवडे सुरु असलेली शेअर बाजारातील घसरण 8 ऑगस्ट रोजी थांबली. या दिवशी सेन्सेक्स 746.29 अंकांच्या वाढीसह 80604.08 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 221.75 अंकांनी वाढल्यानंतर 24585.05 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील वाढीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी यांना झाला आहे. त्यांच्या संपत्तीत फक्त एका दिवसात 5.74 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
शेअर बाजारातील या तेजीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी यांना झाला. फक्त एका दिवसात त्यांची संपत्ती 5.74 अब्ज डॉलर्स (5,03, 01, 91,88,700) ने वाढली. यासह, त्यांची एकूण संपत्ती 79.7 अब्ज डॉलर्स झाली आणि ते ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत परतले. गौतम आदनी यांच्याबरोबरच अन्य भारतीय अब्जाधिशांच्या संपत्तीत देखील वाढ झाली आहे. अब्जाधिशांच्या यादीत मुकेश अंबानी 18 व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी एका दिवसात 1.40 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर हे देखील अब्जाधिशांच्या यादीत 56 व्या क्रमांकावर आहेत. शेअर बाजारातील तेजीचा मोठा फायदा झाल्याचे पाहायाल मिळत आहे.
अब्जाधिशांच्या यादीत अंबानींचा कितवा क्रमांक?
अब्जाधिशांच्या यादीत मुकेश अंबानी 18 व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी एका दिवसात 1.40 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 99.5 अब्ज डॉलर्स आहे. कमाईच्या बाबतीत फक्त एलोन मस्क अदानींपेक्षा पुढे आहेत. $6.69 अब्जच्या वाढीसह, ते जगातील टॉप 20 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. ओरेकलचे संस्थापक लॅरी एलिसन यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती $3.30 अब्जने वाढली आहे. यासह, त्यांची एकूण संपत्ती $305 अब्जवर पोहोचली आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग $269 अब्जच्या एकूण संपत्तीसह जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असले तरी, या काळात त्यांना $1.15 अब्जचे नुकसान सहन करावे लागले आहे.
अब्जाधिशांच्या यादीत इतरही अनेक भारतीय
ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत अदानी-अंबानी व्यतिरिक्त इतर अनेक भारतीय आहेत. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर $35.3 अब्जच्या एकूण संपत्तीसह यादीत 56 व्या क्रमांकावर आहेत. त्याच वेळी, शापूर मिस्त्री आणि सावित्री जिंदाल अनुक्रमे $32.3 अब्ज आणि $31.5 अब्जच्या मालमत्तेसह 64 व्या आणि $65 व्या स्थानावर आहेत. याशिवाय, सुनील मित्तल, अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल, दिलीप संघवी, कुमार बिर्ला, राधाकिशन दमानी यांसारखे अनेक भारतीय उद्योगपती अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























