Nagpur Accident: लेकीला ITI च्या परीक्षेसाठी सोडून रस्ता ओलांडताना अपघात; दुभाजकावर डोकं आदळून वडिलांचा मृत्यू
Nagpur Accident: हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथे आज सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

Nagpur Accident:नागपूर जिल्यातील हिंगणा तालुक्यात डोंगरगाव येथे आज (12 ऑगस्ट) सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असताना कंटेनरने धडक देत चिरडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
परीक्षेला सोडून रास्ता ओलांडताना अपघात
मृत पादचारी भीसम दिनुराम शाहू (वय 50, रा. गोपालनगर, कळमना, नागपूर) हे आपल्या मुलगी प्रियंका भीसम शाहू (वय 18) हिला आयटीआयच्या परीक्षेसाठी डोंगरगाव येथे घेऊन आले होते. प्रियंका शासकीय तंत्रनिकेतन, बर्डी येथे शिक्षण घेत असून मेघसाई खाजगी आयटीआय, डोंगरगाव येथे तिची परीक्षा होती. सकाळी तीला परीक्षागृहात सोडल्यानंतर भीसम शाहू रस्ता ओलांडत होते. हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथे आज सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असताना कंटेनरखाली चिरडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
दुभाजकावर डोकं आदळून वडिलांचा जागीच मृत्यू
त्याच वेळी भारती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज कंपनीचा अशोक लेलँड कंटेनर (क्र. MH40 CM 9800) वेगात येत त्यांनी जोराची धडक दिली. धडकेनंतर शाहू यांचा पाय थेट कंटेनरच्या चाकाखाली आला, तसेच दुभाजकावर डोके आपटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघात एवढा भीषण होता की, त्यांनी जागीच प्राण सोडले.
घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून वाहन जप्त करण्यात आले आहे. अपघातस्थळी काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. या अपघाताची नोंद हिंगणा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरचालकाचा वेग जास्त होता आणि रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला वेळेत थांबवण्यास तो अपयशी ठरला. पोलिस अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास करत आहेत.
जळगावमध्ये सुलेमान खानची टोळक्याकडून निर्घृण हत्या
जामनेर तालुक्यात घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेत सुलेमान खान (वय 21) या तरुणाची टोळक्याने अमानुष पद्धतीने हत्या केली. 10-15 जणांच्या टोळक्याने तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या केली. तडफडत असताना त्याला वैद्यकीय मदत न देता, थेट मृत्यूच्या दाढेत ढकलले. एवढ्यावरच थांबता न, आरोपींनी त्याचा मृतदेह मूळ गावी आणून घरासमोर फेकला आणि त्याच्या आई-वडिलांसह बहिणीलाही बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
























