Eknath Shinde: महायुती राज्यात पुन्हा करणार सत्ता स्थापन, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार? एकनाथ शिंदे म्हणाले...
Eknath Shinde: महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यांमध्ये आणि प्रचारावेळी योजनेची 1500 ची रक्कम वाढवून ती 2100 केली जाईल असं आश्वासन दिलं होतं, त्याबाबत आता शिवसेना प्रमुख आणि महायुतीतील नेते एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Eknath Shinde: राज्यात नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महायुती सरकारला यश आलं आहे. या यशामागे काही महिन्यांपुर्वी महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे श्रेय असल्याचं बोललं जात आहे. मात्र, महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यांमध्ये आणि प्रचारावेळी योजनेची 1500 ची रक्कम वाढवून ती 2100 केली जाईल असं आश्वासन दिलं होतं, त्याबाबत आता शिवसेना प्रमुख आणि महायुतीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'च्या सहाव्या हप्त्याबद्दल मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ही योजना एक महत्त्वाचा गेम चेंजर ठरल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे. 2024 मध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली आणि तातडीने अंमलात आणली. योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 दिले जात होते. याच्या पाच हप्त्यांचे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीर केले होते की, जर त्यांना सत्ता मिळाली तर या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेची वाढ करणार. निवडणुकीत महायुतीला 288 पैकी 235 जागांवर विजय मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी योजनेचा पुढील हप्ता 2100 असणार आहे, अशी घोषणा केली आहे.
शिवसेना महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "आता योजनेअंतर्गत दिले जाणारे 1500 नाही तर 2100 होतील. या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि विरोधकांना यामुळे धक्का बसला आहे.आपल्या मतांनी आम्हाला बहुमत दिलं आणि आम्ही यशस्वी होऊन राज्यात मोठा विजय मिळवला. आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत. आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत. पत्रकार नेहमी मला विचारायचे की तुमच्या किती जागा येणार? त्यावेळी मी त्यांना म्हणायचो, आम्हाला बहुमत मिळेल. मात्र, तुम्ही आम्हाला बहुमतापेक्षा जास्त जागा दिल्या आहेत. मी म्हणायचो आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल. परंतु, तुम्ही तर विरोधकांना डम्पिंग मध्ये टाकलं", असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI