एक्स्प्लोर

देवळी मतदारसंघात काँग्रेस विजयाचा षटकार लावणार? महायुतीचे राजेश बकाने आव्हान मोडीत काढणार? 

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्याच्या देवळी विधानसभा मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व आहे? यंदा कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Deoli Vidhan Sabha Election 2024 देवळी  : संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल अखेर फुंकल्या गेले आहे. या निवडणुकांच्या (Vidhansabha)अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यंदा एकला चलो रे चा नारा देत विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit bahujan aghadi) विधानसभा उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. तसेच राज्यात झालेल्या अलिकडे झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे यंदाची निवडणुक अधिक चुरशीची होणार हे जवळ जवळ निश्चित आहे. 

दरम्यान, राज्यात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वर्ध्याच्या देवळी - पुलगाव मतदार संघात राजकीय पटलावर काँग्रेसचे कायम आपले वर्चस्व गाजवले आहे. देवळी-पुलगाव मतदार संघात काँग्रेसच्या तिकिटावर पाच वेळा आमदार रणजित कांबळे निवडून आले आहे. दरम्यान यंदा भाजपने आपल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत देवळी-पुलगाव मतदारसंघातून राजेश बकाने यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र काँग्रेस अथवा महाविकास आघाडी कडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे तब्बल पाच वेळा काँग्रेसचा गड अभेद्य ठेवणाऱ्या  रणजित कांबळे यांना सहाव्यांदा संधी दिली जाते, की यावेळी काँग्रेसकडून नव्या उमेदवाराला संधी दिली जाते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पाच वेळा आमदाराला पुन्हा संधी, की मविआ नवा चेहरा देणार?

देवळी - पुलगाव मतदार संघात काँग्रेसच्या तिकिटावर पाच वेळा आमदार रणजित कांबळे निवडून आले आहे. यावेळी काँग्रेसकडून उमेदवार बदलविला जाणार काय? याकडे सर्वांचे लक्ष असताना राज्यपाल राहिलेल्या स्व. प्रभा राव यांच्या कन्या चारूलता टोकस यांनी देखील काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून अर्ज करीत उमेदवारीचा दावा केला आहे. तर महायुतीमध्ये भाजपला देवळीची उमेदवारी जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. त्यानुसार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने हे भाजपकडून रिंगणात उतले आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी तयारी सुरू केली होती. तर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने देखील महायुती कडून शर्यतीत होते. यात माजी राज्यमंत्री अशोक शिंदे आणि जिल्हाध्यक्ष गणेश इखार यांनी देखील उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपने राजेश बकाने यांना मैदानात उतरवत काँग्रेसच्या तिकिटावर पाच वेळा आमदार राहिलेल्या रणजित कांबळे यांना आव्हाने दिले आहे. 

महायुतीकडून भाजपचे राजेश बकाने मैदानात 

दरम्यान, वर्धा जिल्ह्यात विविध मतदार संघात काँग्रेसचे कायम वर्चस्व राहिले आहे. मात्र गेल्या दहा वर्षात भाजपने जागा जिंकून वर्चस्व मिळवत काहीशी आगेकूच केली आहे. मात्र लोकसभेत भाजपला अपयश आले आहे. तर आता आपला गड वाचविण्यासाठी जो तो लोकप्रतिनिधी महायुतीकडून खिंड लढविणार आहे. राजकीय गणित जमविण्यासाठी रात्रीला विरोधकांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा देखील वाढला आहे. महाविकास आघाडीत मात्र अलीकडे एकजुटीने काम करण्याची ओढ दिसू लागली आहे. महाविकास आघाडीत पुढील काळात उमेदवारी नेमकी कुणाला मिळते यावर मतदार संघात कोणता कार्यकर्ता कुणाच्या पाठीशी उभा राहतो हे ठरणार आहे. पण लोकसभेप्रमाणे यावेळी देखील एकजूट दाखविल्या शिवाय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना पर्याय नाही, असेच बोलले जात आहे. 

हे ही वाचा 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget