एक्स्प्लोर

Akola East Assembly Election 2024: अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान

Akola East Assembly Election 2024: या मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंचे भाचे रणधीर सावरकर हे गेल्या दोन टर्मपासून आमदार आहेत. पक्ष तिसऱ्यांदाही त्यांनाच निवडणूकीत उतरवणार असल्याचे स्पष्ट आहे

Akola East Assembly Election 2024: अकोला जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेला सर्वात मोठा आणि महत्वाचा मतदारसंघ म्हणजे अकोला पुर्व मतदारसंघ. शहरी आणि ग्रामीण तोंडवळा असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अकोला महापालिकेचे 8 प्रभागासोबतच अकोला तालुक्याचा ग्रामीण भाग समाविष्ट आहे. या मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंचे भाचे रणधीर सावरकर हे गेल्या दोन टर्मपासून आमदार आहेत. पक्ष तिसऱ्यांदाही त्यांनाच निवडणूकीत उतरवणार असल्याचे स्पष्ट होते. तर महाविकास आघाडीत या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये रस्सीखेच सुरू आहेत. ठाकरे गटाकडून पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेतील गटनेते गोपाल दातकर, या मतदारसंघाचे दहा वर्ष आमदार राहिलेले माजी आमदार हरिदास भदे आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख देवश्री ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेस कडून पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजा काळे, राजेश मते आणि ज्येष्ठ नेते हेमंत देशमुख यांचे नाव चर्चेत आहेय.

या मतदारसंघात मोठी ताकद असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अद्याप स्पष्ट नाहीय. वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक डॉ. संतोष हुशे आणि डॉ. हर्षवर्धन मालोकार यांची नावं चर्चेत आहेय.

अकोला पुर्व मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे रणधीर सावरकर 24,723 मतांनी विजयी 

उमेदवार                   पक्ष             मते 
रणधीर सावरकर       भाजप         100475
हरिदास भदे              वंचित          75752
विवेक पारसकर         काँग्रेस         9533

अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारसंख्या : 

स्त्री : 173510
पुरूष : 180165
तृतीयपंथी : 15
एकूुण : 353690

या मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या 3 लाख 53 हजार 690 इतकी आहेय. 2014 मध्ये युतीत सेनेच्या ताब्यातील या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललं. गेल्या दहा वर्षांत आमदार रणधीर सावरकर यांनी मतदारसंघावर चांगलीच पकड बसवलीय.  जिल्ह्याच्या राजकारणात धोत्रे गटाचे 'चाणक्य' म्हणून जिल्ह्यात रणधीर सावरकर यांची ओळख आहेय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघात भाजपला 27 हजार मतांची आघाडी मिळाली होतीय. या निवडणुकीत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था, खारपाणपट्ट्याचा प्रश्न, त्याबरोबरच मोठे उद्योग नसल्याने वाढलेली बेरोजगारी हे प्रश्न गाजण्याची शक्यता आहेय. सध्या जिल्हा आणि भाजपाच्या राजकारणावर आमदार रणधीर सावरकर यांची मोठी पकड आहे. त्यामुळे आमदार सावरकर यांचे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचे विरोधक या मतदारसंघात मोठी ताकद लावण्याची शक्यता आहे. त्यामूळे अकोला पूर्व मतदासंघातील निवडणुक निश्चितच 'हाय होल्टेज' असेल यात शंका नाही.

अकोला पूर्वमधून ही नावे आहेत चर्चेत 

काँग्रेसकडून डॉ. सुभाषचंद्र कोरपे (संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक), अविनाश देशमुख, पूजा काळे (काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा), डॉ. प्रशांत पाटील वानखडे ही नावे चर्चेत आहेत. शिवसेना उबाठा पक्षाकडून गोपाल दातकर (जिल्हाध्यक्ष, जि.प.सदस्य), मंगेश काळे (माजी नगरसेवक), हरिदास भदे (माजी आमदार) यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून आमदार रणधीर सावरकर, तेजराव थोरात (माजी जिल्हाध्यक्ष) ही नावे चर्चेत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग पिंजरकर (जिल्हाध्यक्ष शिंदे सेना) हे नाव चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून बालमुकूंद भीरड (ओबीसी नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष), प्रा. संतोष हुशे (ओबीसी नेता), ज्ञानेश्वर सुलताने (विरोधी पक्ष नेता), शंकरराव इंगळे, सचिन भांडे (माजी राज्यमंत्री यांचे सुपूत्र), शिरिष देशमुख, गोपाल ढोरे ही नावे चर्चेत आहेत अपक्ष म्हणून गजानन हरणे (सकल गरजवंत मराठा, कुंबी, देशमुख , पाटील असामी समाज), संजय वानखडे (सुशिक्षित बेरोजगार फेडरेशन), मनोज तायडे (शेतकरी संघटना) या नावांची चर्चा आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
Kurla Assembly Seat : कुर्ला विधानसभेची लढत ठरली, ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर रिंगणात, शिंदेंकडून मंगेश कुडाळकर लढणार
कुर्ला विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर मैदानात, शिंदेंच्या मंगेश कुडाळकरांना आव्हान
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Kadam Dapoli : दापोली विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोळ? संजय कदम आक्रमक1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 23 OCT 2024Top 25 : टॉप 25 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 23 ऑक्टोबर 2024: ABP MajhaMahesh Sawant Mahim Vidhan Sabha :  माहिम मतदारसंघ ठाकरे पक्षाचे महेश सावंत यांच्या नावाची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
Kurla Assembly Seat : कुर्ला विधानसभेची लढत ठरली, ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर रिंगणात, शिंदेंकडून मंगेश कुडाळकर लढणार
कुर्ला विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर मैदानात, शिंदेंच्या मंगेश कुडाळकरांना आव्हान
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या
Bengaluru : बंगळूरमध्ये सात मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात कोसळली; 7 जणांचा अंत
Video : बंगळूरमध्ये सात मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात कोसळली; 7 जणांचा अंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
Akola East Assembly Election 2024: अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान
अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान
Anna Bansode: पक्षांतर्गत अन् महायुतीचा विरोध डावलला? अण्णा बनसोडेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर; नाराज गट प्रचारात दिसणार?
पक्षांतर्गत अन् महायुतीचा विरोध डावलला? अण्णा बनसोडेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर; नाराज गट प्रचारात दिसणार?
Embed widget