एक्स्प्लोर

SSC Result 2024 : दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर; झटपट निकाल पाहण्यासाठी 'या' वेबसाईट्स फॉलो करा!

SSC Result 2024 : दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतही डाऊनलोड करता येणार आहे. 

Maharashtra Board SSC 10th Result 2024 : पुणे : राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालातही कोकण विभागाने 99.01 टक्क्यांसह अव्वल ठरला आहे. तर 97.21 टक्क्यांसह मुलींनी यंदाही बाजी मारली आहे. 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान दहावीची परीक्षा झाली होती. यंदा 15 लाख 60 हजार 164 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 84 लाख 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतही डाऊनलोड करता येणार आहे.                                 

निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2023 -2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील, तसेच, निकालाची प्रत विद्यार्थी डाऊनलोडही करू शकणार आहेत.                 

दहावीचा निकाल कुठे पाहाल?                              

कसा पाहाल निकाल? 

स्टेप 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या. 

स्टेप 2 : होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 

स्टेप 3 : तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नाव नोंदवा.

स्टेप 4 : स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा. 

स्टेप 5 : निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या. 

दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची छापील प्रत काही दिवसांनतर त्यांच्या संबंधित शाळांमध्ये उपलब्ध होईल.

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)

पुणे : 96.44 टक्के 
नागपूर : 94.73 टक्के 
छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के 
मुंबई : 95.83 टक्के 
कोल्हापूर : 97.45 टक्के 
अमरावती :  95.58 टक्के 
नाशिक : 95.28  टक्के 
लातूर : 95.27 टक्के 
कोकण : 99.01  टक्के 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Malegaon Mayor Election 2026: काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
Embed widget