एक्स्प्लोर

SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!

MSBSHSE Exam Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा (10th Exam Result 2024) निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

SSC 10th Result 2024 : पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board SSC Result LIVE) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. 

यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे. नागपूर विभाग 94.73 टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये  मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के लागला आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86 टक्के इतकी आहे. 

माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर आज दुपारी 1 वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येणार आहे. 

निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2023 -2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील, तसेच, निकालाची प्रत विद्यार्थी डाऊनलोडही करू शकणार आहेत. 

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)

दहावीचा निकाल कुठे पाहाल? 

कसा पाहाल निकाल? 

स्टेप 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या. 

स्टेप 2 : होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 

स्टेप 3 : तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नाव नोंदवा.

स्टेप 4 : स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा. 

स्टेप 5 : निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या. 

दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची छापील प्रत काही दिवसांनतर त्यांच्या संबंधित शाळांमध्ये उपलब्ध होईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

दहावीच्या निकालासंदर्भातील सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

पाहा व्हिडीओ : Maharashtra SSC 10th Result Announced : राज्यातील दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग अव्वल

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
Pune Police :  अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPune Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण, गरोदर महिलांना व्हायरसचा धोका अधिकVijay Wadettiwar : मराठीच्या मुद्द्यावर मविआ विधानसभा लढवणार? वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य!Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
Pune Police :  अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
Embed widget