JEE Mains 2023 जानेवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकला; विद्यार्थी आणि पालकांची मागणी, पण का?
JEE Main 2023: शैक्षणिक सत्र 2023-24 साठी जेईई मेन 2023 जानेवारीतील परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.
JEE Mains 2023: शैक्षणिक सत्र 2023-2024 साठी जेईई मेन्स 2023 ची (JEE Mains 2023) परीक्षा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जेईई मेन्स 2023 परीक्षा 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. पहिलं सत्र जानेवारी 2023 मध्ये आणि दुसरं सत्र एप्रिल 2023 मध्ये घेण्यात येईल. या वर्षीही संयुक्त प्रवेश परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेकडे सोपवली आहे.
परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल उमेदवारांमध्ये नाराजी आहे. देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये इंजीनियरिंगला प्रवेश मिळवण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स 2023 परीक्षेचा पहिला सत्र देशभरात 24 ते 30 जानेवारी दरम्यान ठेवण्यात आलं आहे. मात्र त्याच दरम्यान बारावी बोर्ड परीक्षेच्या प्रात्यक्षिक आणि प्रिलिम परीक्षा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षेचा अभ्यास करायचा की, जेईई मेन्स परीक्षेची तयारी करायची? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ट्विटर आणि इतर सोशल माध्यमांद्वारे विद्यार्थी ही मागणी करत आहेत. तर पालक संघटनांनीसुद्धा पंतप्रधानांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.
अनेक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की, जानेवारीमध्ये होणार्या संयुक्त प्रवेश परीक्षेचं (JEE Main 2023) पहिलं सत्र पुढे ढकलण्यात यावं. कारण त्याचदरम्यान बारावी बोर्डाची परीक्षा असणार आहे. यामध्ये इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी जेईई परीक्षेसोबत बारावी परीक्षेत 75 टक्क्यांची अटसुद्धा असल्यानं ही अट शिथिल करण्याची मागणीसुद्धा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
जेईई मेन्समध्ये दोन पेपर
मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेत दोन पेपर असतात. पेपर 1 हा (BE/B.Tech) साठी आहे. NITs, IIITs आणि इतर केंद्रीय अनुदानित संस्था (CFTIs) अनुदानित, मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठात अंडर ग्रॅज्युएट इंजिनीअरिंग प्रोग्राम्स (BE/B.Tech.) मध्ये प्रवेश घेण्यासाठी हा पेपर असतो तर तर, बी.आर्क आणि बी.प्लॅनिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेपर 2 घेतला जातो. याशिवाय, जेईई मेन ही जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्रता परीक्षा आहे, जी आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते.
जेईई मेन 2023: महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात : 15 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत सकाळी 9:00 पर्यंत
क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट-बँकिंग/UPI द्वारे अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2023 रात्री 11:50 पर्यंत
परीक्षा केंद्र शहरांची घोषणा: जानेवारी 2023 चा दुसरा आठवडा
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI