JEE Advanced Result 2023 : जेईई ॲडवान्सचा निकाल जाहीर; 'येथे' पाहा निकाल
JEE Advanced Result : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) तर्फे आज संयुक्त प्रवेश परीक्षा JEE Advanced 2022 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
JEE Advanced Result 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) ने आज जेईई ॲडवान्स 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज 18 जून रोजी, सकाळी 9 वाजता JEE Advanced 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठीची अधिकृत लिंक सक्रिय करण्यात आली असून परीक्षार्थी त्यांचा निकाल पाहू शकता. jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी त्यांचा तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
जेईई ॲडवान्स 2023 परीक्षेचा निकाल जाहीर
JEE Advanced Result 2023 मध्ये उत्तीर्ण उमेदवार जॉइंट सीट ॲलोकेशन, JoSAA 2023 साठी (JoSAA 2023 registration) नोंदणी करू शकतात. ही नोंदणी 19 जून 2023 पासून सुरू होणार आहे. निकाल तपासण्यासाठी परीक्षार्थी येथे दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून निकाल तपासू शकतात.
JEE Advanced परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांचा समावेश होता. तीनही पेपर प्रत्येकी दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी 60-60 गुणांसाठी आयोजित करण्यात आले होते. याशिवाय आयआयटी गुवाहाटीने परीक्षेची अंतिम उत्तरपत्रिकाही जारी केली आहे.
व्हीसी रेड्डी देशात अव्वल
आयआयटी गुवाहाटीने (IIT Guwahati) जेईई ॲडवान्स 2023 (JEE Advanced 2023) चा निकाल जाहीर केला आहे. यावेळी या परीक्षेत टॉपर महिला ठरली आहे. यावेळी हैदराबाद झोनची व्हीसी रेड्डी या परीक्षेत अव्वल ठरला आहे. वी चिदविलास रेड्डीने JEE Advanced मध्ये 360 पैकी 341 गुण मिळवले आहेत. तर 360 पैकी 298 गुण मिळवणारी नायकांती नागा भव्य श्री ही महिला टॉपर ठरली आहे.
एकूण 1,80,372 परीक्षार्थी
यंदा जेईई ॲडव्हान्स 2023 मध्ये (JEE Advanced Result 2023 Declared) एकूण 1,80,372 विद्यार्थी बसले होते. यावर्षी JEE Advanced 2023 परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होती. तर दुसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज परीक्षेचा निकाल जाहीर झाला. निकाल तपासण्यासाठी परीक्षार्थींना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल.
निकाल कसा पाहायचा, जाणून घ्या
- JEE Advanced परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट द्या
- यानंतर मुख्यपृष्ठावरील निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- येथे तुम्हांला नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर सबमिट करा.
- आता तुम्हाला निकाल दिसेल.
- त्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल डाउनलोड करा.
- तुम्ही निकालाची प्रिंट आउटदेखील घेऊ शकता.
JEE Advanced Result 2023 Check Here : तुमचा जेईई ॲडवान्स परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI